Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत

मुंबई ः सांगली लोकसभेसाठी इच्छूक असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी अधिकृतरित्या ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत हातावर श

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर
आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटातील ‘तुर कलेयां’ गाणे रिलीज.
आगीत नऊ माणसांसह चार जनावर होरपळले

मुंबई ः सांगली लोकसभेसाठी इच्छूक असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी अधिकृतरित्या ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरेंनी शेतकर्‍यांच्या मुलाचा सन्मान केला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगलीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. मला आज मनापासून उद्धव ठाकरेंचे आभार मानायचे आहेत. एका शेतकर्‍याचा मुलाला तुम्ही जो सन्मान केलात त्याबद्दल मी आभार मानतो. मी आज जास्त काही बोलणार नाही. पण खात्रीने सांगेन की लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातला आपला पहिला निकाल असेल. एका शेतकर्‍याच्या मुलाला एवढ्या मोठ्या कुटुंबात सहभागी करुन घेतले, त्यामुळे मी आभार मानतो. तसेच यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंना गदाही भेट दिली आणि त्यानंतर हाती शिवबंधन बांधले.

COMMENTS