Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नाशिक : जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आ

वसंत रांधवण यांना निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर
व्यावसायिक महाविद्यालयांच्या अतिरिक्त शुल्क आकारणीला चाप
दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

नाशिक : जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आशिमा मित्तल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शासकीय कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्यगीताचे सादरीकरण केले. मतदार जनजागृती अभियानांतर्गत यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रवींद्र परदेशी यांनी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदान जनजागृतीची शपथ दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना आगामी निवडणुकीत आपला हक्क बजावत मतदान करण्याचे आवाहन करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) दिपक पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे,  कार्यकारी अभियंता इवद 2 पंकज मेतकर, कार्यकारी अभियंता इवद 3 शैलजा नलावडे, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग वैशाली ठाकरे, कृषी विकास अधिकारी माधवी गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS