Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राम्हणगावात महाराष्ट्र दिन उत्साहात

कोपरगाव तालुका ः महाराष्ट्र स्थापना दिन व कामगार दिन ब्राम्हणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती येथें उत्साहात संपन्न झाला  शाळेचे म

Pathardi :अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न- बाळासाहेब सानप| Lok News24
राहुरी फॅक्टरीजवळील अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
LokNews24 l अहमदनगर जिल्ह्याचा आढावा

कोपरगाव तालुका ः महाराष्ट्र स्थापना दिन व कामगार दिन ब्राम्हणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती येथें उत्साहात संपन्न झाला  शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्‍वर वाकचौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले  शाळेतील शिक्षक महेंद्र निकम यांनी एक मे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले संयुक्त महाराष्ट्रात चळवळ व मुंबईसह महाराष्ट्र कसे स्वतंत्र झाले याचेही महत्त्व याप्रसंगी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणांमधून विशद केले माझी लोकशाही व माझा फळा याचे फलक लेखन करण्यात आले उपस्थितांना तेरा मे रोजी मतदान कराच आणि मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या घोषणांद्वारे विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली विद्यार्थ्यांना निकाल पत्रक वाटप करून  निकाल घोषित करण्यात आला याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब केकाण उपाध्यक्ष वैशाली मोरे व सतीश मोरे प्रवीण सांगळे वामन जाधव श्रावण अहिरे, पांडुरंग मगर, सुनीता माळी, सुखदेव बनकर आणि  पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार श्रीमती मनीषा जाधव यांनी मानले.

COMMENTS