Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादा चौधरी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा

अहमदनगर - महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० म्हणजेच आजपासून बरोबर ६४ वर्षांपूर्वी करण्यात आली.१ मे रोजी संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण

बेलापुरात एकाची आत्महत्या l LokNews24
आढळा खोरे बारमाहीसाठी शेतकरी व कार्यकर्ते एकवटले
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे बुर्‍हाणनगर येथून अपहरण

अहमदनगर – महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० म्हणजेच आजपासून बरोबर ६४ वर्षांपूर्वी करण्यात आली.१ मे रोजी संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण असतं.महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्यासाठी हा दिवस दरवर्षी मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो.महाराष्ट्रात कला व कलाकृती आहेत.ते आपले भाग्य आहे.देशाचे नेतृत्व घडवतील असे विद्यार्थी शिक्षकांनी तयार करण्याची अपेक्षा दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे यांनी व्यक्त केली. हिंद सेवा मंडळाचे दादा चौधरी विद्यालय,दादा चौधरी मराठी शाळा,मेहेर इंग्लिश स्कूल, भाईसथ्था नाईट हायस्कूल, पा.ड.कन्या विद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अनंत देसाई,मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी,भाई सथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे,सहाय्यक सचिव बी.यु.कुलकर्णी,दादा चौधरी विद्यालयाच्या प्र.मुख्याध्यापिका सौ.नंदा कानिटकर,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले,मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.अनुरीता झगडे,पा.ड.क.वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रोहिणी फळे,गोविंद धर्माधिकारी,सौ.वर्षा गुंडू,सुखदेव नागरे,भारत औटी,मनोज हिरणवाळे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अनंत देसाई व जगदीश झालानी यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रा.अनुरीता झगडे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय महादेव राऊत यांनी करुन दिला.सूत्रसंचालन सौ.वर्षा गुंडू आणि सुखदेव नागरे यांनी केले.तर आभार प्र.मुख्याध्यापिका सौ.नंदा कानिटकर यांनी मानले.                                 

COMMENTS