Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराजा होळकरांचे कार्य समाजासाठी स्फूर्तिदायक ः विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध पहिले महायुद्ध पुकारणार्‍या श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांनी स्वतःच्या बळावर इंग्रजांना

नवरात्रोत्सवातच नव्हे तर वर्षभर स्त्रीशक्तीचा आदर करा ः विवेक कोल्हे
आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे
पाणी प्रश्‍न सुटण्यासाठी व्यापक लढा उभारणार ः कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध पहिले महायुद्ध पुकारणार्‍या श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांनी स्वतःच्या बळावर इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल 18 वेळा पराभूत केले होते. अशा महापराक्रमी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा इतिहास व जीवनकार्य समाजासाठी स्फूर्तिदायक असून, तो इतिहास नवीन पिढीसमोर मांडण्याची गरज आहे. तरुण पिढीने महाराज यशवंतराव होळकर यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.
श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांचे वंशज स्वप्नील राजे होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ते इंदौर (मध्य प्रदेश) पर्यंत श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथून 7 मे रोजी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांचा ब्रांझ धातूपासून बनविलेला भव्य 14 फूट उंचीचा अश्‍वारूढ पुतळा घेऊन वाजतगाजत निघालेली ही शौर्य यात्रा मंगळवारी (9 मे) कोपरगाव शहरात मुक्कामी होती. बुधवारी (10 मे) ही शौर्य यात्रा इंदौरकडे निघाली असताना येसगाव (ता.कोपरगाव) येथे युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीने या शौर्य यात्रेचे स्वागत केले व श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विवेक कोल्हे यांनी या शौर्य यात्रेत सहभागी झालेले महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांचे वंशज स्वप्नील राजे होळकर, महाराज यशवंतराव होळकर शौर्य यात्रा व पुतळा प्रतिष्ठापना समितीचे समन्वयक सुधीरभाऊ देडगे, शौर्य यात्रेचे मुख्य संयोजक अमरजित राजे बारगळ, सहसंयोजक रवींद्र भुसारी यांचा सत्कार केला. श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांची शौर्य यात्रा इंदौर येथे पोहोचल्यानंतर 13 मे रोजी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांची शौर्यगाथा जनतेसमोर मांडण्यासाठी पुणे ते इंदौरपर्यंत शौर्य यात्रा काढल्याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांनी महाराज यशवंतराव होळकर यांचे वंशज स्वप्नील राजे होळकर, पुतळा प्रतिष्ठापना समितीचे समन्वयक सुधीरभाऊ देडगे, शौर्य यात्रेचे मुख्य संयोजक अमरजित राजे बारगळ, सहसंयोजक रवींद्र भुसारी यांचे आभार मानले. यावेळी स्वप्नील राजे होळकर व सुधीरभाऊ देडगे यांनी विवेक कोल्हे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, येसगाव ग्रामस्थ तसेच धनगर व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS