Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराजांनी स्वतःवरच केले वार; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात ; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया ; प्रकृती स्थिर

पाथर्डी : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी आपल्या अंगावर शस्राचे वार करून घेण्याची घटना रविवारी (ता. १५)  घडली. या घटनेने तारकेश्वर गडाच्या भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून आदिनाथ महाराज शास्री यांनी नेमका हा प्रकार का केला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आदिनाथ महाराज यांनी गडावर असलेल्या गो शाळेच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात गेले व त्यांनी स्वतःच्या अंगावर धारदार शस्राने वार करून घेतले. या घटनेची माहिती कळताच गडावरील सेवेकरी व भाविकांनी तात्काळ त्यांना पाथर्डी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.या वेळी मोठा रक्तश्राव होत असल्याने आदिनाथ महाराज शास्त्री यांना तात्काळ अहिल्या नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच अहिल्यानगर येथील रुग्णालयात आमदार मोनिका राजळे, आ.संग्राम जगताप व जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डीले यांनी रुग्णालयात धाव घेतली.या नंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर शस्र चालवल्याची माहिती कळताच काही भक्तांनी थेट अहिल्यानगर ला धाव घेतली तर तालुक्यात सर्वत्र याच विषयवार मोठी चर्चा सुरु झाली होती.अत्यंत शांत स्वभावाचे म्हणून शास्री सर्वपरिचित आहेत. अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या वेळी अहिल्या नगर जिल्ह्यातून ज्या मोजक्याच प्रतिष्ठित मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते त्यात आदिनाथ शास्त्री यांचा समावेश होता. तर त्यांनी काढलेल्या तारकेश्वर गड ते पंढरपूर दिंडीला राज्यशासनाच्या प्रथम पुरस्कारही मिळाला होता.राज्यात तारकेश्वर गडाला मानणारा मोठा भाविक वर्ग असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तारकेश्वर गडाला भेट देत विविध विकासकामांचे उदघाटन केले होते. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घोषित केले असून आणखी एक आठवडा त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. या घटनेनंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सोशल मीडियावर आपली प्रकृती चांगली असून लवकरच आपण पुन्हा गडावर येणार असल्याचे जाहीर करत आपल्या भक्तांना शांततेचे आवाहन केले आहे.

कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाचीमंत्री चंद्रकांत पाटील; 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी विविध कला पुरस्कारांचे वितरण
शेवगाव सायकल असोसिएशनतर्फे गुणवंत महिलांचा सन्मान
महिला कर्मचार्‍यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत

पाथर्डी : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी आपल्या अंगावर शस्राचे वार करून घेण्याची घटना रविवारी (ता. १५)  घडली. या घटनेने तारकेश्वर गडाच्या भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून आदिनाथ महाराज शास्री यांनी नेमका हा प्रकार का केला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आदिनाथ महाराज यांनी गडावर असलेल्या गो शाळेच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात गेले व त्यांनी स्वतःच्या अंगावर धारदार शस्राने वार करून घेतले.

या घटनेची माहिती कळताच गडावरील सेवेकरी व भाविकांनी तात्काळ त्यांना पाथर्डी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.या वेळी मोठा रक्तश्राव होत असल्याने आदिनाथ महाराज शास्त्री यांना तात्काळ अहिल्या नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती कळताच अहिल्यानगर येथील रुग्णालयात आमदार मोनिका राजळे, आ.संग्राम जगताप व जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डीले यांनी रुग्णालयात धाव घेतली.या नंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर शस्र चालवल्याची माहिती कळताच काही भक्तांनी थेट अहिल्यानगर ला धाव घेतली तर तालुक्यात सर्वत्र याच विषयवार मोठी चर्चा सुरु झाली होती.अत्यंत शांत स्वभावाचे म्हणून शास्री सर्वपरिचित आहेत.

अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या वेळी अहिल्या नगर जिल्ह्यातून ज्या मोजक्याच प्रतिष्ठित मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते त्यात आदिनाथ शास्त्री यांचा समावेश होता. तर त्यांनी काढलेल्या तारकेश्वर गड ते पंढरपूर दिंडीला राज्यशासनाच्या प्रथम पुरस्कारही मिळाला होता.राज्यात तारकेश्वर गडाला मानणारा मोठा भाविक वर्ग असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तारकेश्वर गडाला भेट देत विविध विकासकामांचे उदघाटन केले होते. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घोषित केले असून आणखी एक आठवडा त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. या घटनेनंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सोशल मीडियावर आपली प्रकृती चांगली असून लवकरच आपण पुन्हा गडावर येणार असल्याचे जाहीर करत आपल्या भक्तांना शांततेचे आवाहन केले आहे.

COMMENTS