Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगभरातील करोडो लोकांचे उद्धार करते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या समाजाला प्रेरणादायी – करण गायकर

नाशिक प्रतिनिधी - महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज नगर,सातपूर या ठिकाणी स्वराज्य पक्ष व इतर सर

कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ केंद्र व राज्य सरकारने उठवावी अन्यथा शेतकऱ्याच्या रोशाला सामोरे जाण्याची ताकद ठेवावी- करण गायकर 
स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर – करण गायकर  
शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो छावाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार- करण गायकर

नाशिक प्रतिनिधी – महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज नगर,सातपूर या ठिकाणी स्वराज्य पक्ष व इतर सर्व राजकीय पक्ष,संघटना यांच्या वतीने एकत्रित साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना स्वराज्य पक्षाचे संपर्कप्रमुख करण गायकर यांनी सांगितले की जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करून आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र होण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटना लिहून ती या देशाला अर्पित केली व  जातीपातीत विखुरलेल्या अनिष्ट रूढी परंपरेत अडकलेल्या भारत देशाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. प्रत्येक माणसाला सन्मानाने व अभिमानाने त्याचे जगण्याचे अधिकार मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अशा या संघर्षमय महामानवाला सर्व भारतीयांकडून जयंतीच्या दिवशी विनम्र मानवंदना.

यावेळी जयंती उत्सवासाठी मा.महिला बालकल्याण सभापती तथा मा.नगरसेविका हेमलता कांडेकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर, मा.सभापती सदाशिव दादा माळी, प्रमोद जाधव,प्रेम पाटील, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, महेश आहेर,किरण डोखे, पुंडलिक बोडके,नितीन पाटील,अविनाश गायकर,वैभव दळवी,अनिल वाघचौरे, दादासाहेब जोगदंड, मयुर पवार, सचिन यशोद ,अपुर्व पवार, विजय शिंदे, राहुल जाधव आदी उपस्थित होते.

COMMENTS