Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महादजी शिंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

तब्बल 35 वर्षांनी सवंगड्यांनी लुटला आनंद

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा शहरातील श्रीमंत महादजी शिंदे विद्यालयातील विद्यार्थी तब्बल 35 वर्षांनी 1989-90 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्ने

अहिल्यानगरला डिसेंबरमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
चार लाख वीस हजारांचे अठरा मोबाईल नागरिकांना केले परत
नगरमध्ये हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा शहरातील श्रीमंत महादजी शिंदे विद्यालयातील विद्यार्थी तब्बल 35 वर्षांनी 1989-90 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा यवत 24 येथील पार्क मध्ये उत्सहाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महेश सुर्यवंशी सर हे होते. पस्तीस वर्षांपुर्वी सर्वजण दहावीपर्यंत एकत्र शिकले. यानंतर सर्वच विद्यार्थी शिक्षण, व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या वाटांनी निघुन गेले. परंतु लहान असतानाच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. यातुनच सर्वजण व्हॉटस्अप ग्रुपवर पुन्हा एकत्र आले. परंतु प्रत्यक्ष भेटण्याचा योग मात्र येत नव्हता. सर्व सवंगड्यांना एकत्र आणण्यासाठी श्री महेश सुर्यवंशी, महावीर पटवा, सुनील देवकर यांनी सर्व मित्रांचे मोबाईल नंबर मिळवून स्वतंत्र व्हाटस् अप ग्रुप तयार करुुन सर्वांंनाा एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
सर्वच मित्रांना एकत्र येण्यास उत्साहात प्रतिसाद दिला व दिनांक 26 में या दिवशी यवत जवळ यात्री 24 वॉटर पार्क या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता एकत्र आले. सर्व जमल्या नंतर आधी नाष्टा करुन संपल्यानंतर सर्व जण एका छानशी जागी बसुन सर्वांचा परिचय कुटुंबा बदल माहिती सर्व काही शेअर केले सर्वांचा परिचय होताच नंतर जुन्या आठवणींना उजाळा देत जुन्या आठवणी एकमेकांशी शेअर केल्या नंतर वॉटर पार्क मध्ये स्विमिंग व रेन डान्स चा आनंद लुटला नंतर दुपारचं जेवण करून नंतर थोडी विश्रांती घेत विनोद चेष्टा मस्करी व दुपारनंतर बोटींग व तेथे उपलब्ध असलेल्या गेम्स चां आनंद लुटला व शेवटी चहापाणी करून निरोप घेतला.रविवार 26 मे रोजी झालेल्या या गेट-टुगेदर हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. सर्व जुने मित्र एकमेकांना भेटले, दिवसभर केलेल्या एन्जॉय अतिशय आनंदायक ठरला. विशेष म्हणजे गेट टुगेदर साठी राजू भुजबळ हा विमानाने गोव्याहून, नितीन हुलसुरे सोलापूर, देविदास वडवकर संभाजीनगर, चंद्रशेखर वैद्य आणि अभय रेगे पुण्याहून, मंगेश जाधव सातारा, मंगेश काळे आणि सुधाकर क्षीरसागर नगरहून आले तर श्रीगोंदा शहरातुन महेश सुर्यवंशी, सतिष मखरे, महावीर पटवा, पिंटु गाडीलकर, नितीन वाघमारे, भाऊसाहेब सप्रे, संजय आनंदकर, बंटी नय्यर, संजय काळे, अनिल गांधी, सुनिल देवकर, प्रसाद टकले, माधव बनसुडे, फिरोज पठाण सुधाकर रोडे, संदिप भागवत, अशिष भंडारी, जितेंद्र काळे व बायकर उपस्थित राहिले. यावेळी सर्वांना भविष्यात सामाजिक कार्यात काम करणयाचा संकल्प केला.

COMMENTS