वर्धा प्रतिनिधी - महाभारत यात्रेमधून सत्ताधाऱ्यांचा करण्यात आला निषेध.रामटेक येथून निघालेली महाभारत यात्रा आज वर्ध्यात दाखल झाली आहे. युवा परि
वर्धा प्रतिनिधी – महाभारत यात्रेमधून सत्ताधाऱ्यांचा करण्यात आला निषेध.रामटेक येथून निघालेली महाभारत यात्रा आज वर्ध्यात दाखल झाली आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या वतीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेचे नेतृत्व युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष नीहाल पांडे यांनी केले आहे. महाराष्ट्रात चाललेला सत्ता संघर्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सत्ता हिसकावून घेण्याचा घडलेला प्रकार हा निषेधार्थ असल्याचे जनजागरण या यात्रेमधून करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे महाभारतात कौरवांनी पांडवांच्या हातून सत्ता हिसकावून घेत पांडवांना वनवास भोगायला भाग पाडले त्याच पद्धतीने महाराष्ट्रात घडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा निषेध या यात्रे मधून करण्यात येत आहे..वर्ध्यात शिवाजी चौकात या महाभारत यात्रेचे स्वागत करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून गुढी उभारण्यात आली तसेच शिवाजी चौक येथे पायदळ रॅली यावेळी काढण्यात आली. विविध घोषणाही देण्यात आल्या. शेकडो समर्थक या यात्रेत सहभागी झाले आहे. ही यात्रा मुंबई येथे मातोश्रीवर पोहचणार आहे.
COMMENTS