Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

पुणे प्रतिनिधी - आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस आहे. चंद्रयान 3 चंद्रापासून हाकेच्या अंतरावर आहे. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रयान 3 चंद्राच्या

पन्हाळ्यावर सापडला आणखी एक तोफगोळा
कोळशाअभावी राज्यात वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद… देशभरात भारनियमन सुरु होण्याची शक्यता
चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

पुणे प्रतिनिधी – आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस आहे. चंद्रयान 3 चंद्रापासून हाकेच्या अंतरावर आहे. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकेल अशी अपेक्षा आहे.14 जुलै रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित झालेलं चंद्रयान – 3 चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी आणि भारताच्या शास्त्रज्ञांना यश मिळो या साठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट  कडून मंदिरात पहाटे महाअभिषेक केला गेला. अभिषेकला दूध, दही, फळे, सुकेमेवे फळांचा रस वापरण्यात आला. 

आज भारतासाठी मोठा दिवस असून भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याच्या सुरक्षित लँडिंगसाठी गणपतीला अभिषेक करण्यात आला. या वेळी गणपतीच्या मुकुटावर चंद्रकोर लावले होते. मोहीम यशस्वी होण्यासाठी बाप्पाला प्रार्थना केली.  आज संध्याकाळी ठीक 6:40 वाजता, जग त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होईल जेव्हा विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. एखादा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ असेल. या ऐतिहासिक क्षणासह भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश बनेल.

COMMENTS