Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाविकास आघाडी बिघाडीच्या दिशेने…

राज्यात 2019 मध्ये एक अभिनव प्रयोग राबवत तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत. मात्र महाव

सोशल, सोसेल का?
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने…
विरोधकांचा मवाळ सूर !

राज्यात 2019 मध्ये एक अभिनव प्रयोग राबवत तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत. मात्र महाविकास आघाडी एकत्र राहावी अशी आता आघाडीतील पक्षांची इच्छा राहिलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्याला कारण म्हणजे शरद पवार आणि संजय राऊत या दोघांचे वक्तव्य. लोक माझा सांगाती या अद्यावत सुधारित आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. या आवृत्तीच्या निमित्ताने पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाविषयी महत्वाचे भाष्य करत, त्यांच्या उणीवा दाखवून बोचरी टीका केली आहे. त्यामुळे साहजिकच ठाकरे गट बिथरेल असे वाटत असतांनाच, उद्धव ठाकरे यांनी संयमाची भूमिका दाखवली. मात्र संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून केलेले भाष्य म्हणजे राष्ट्रवादीला चांगलेच डिवचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बिघाडीच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे सरकतांना दिसून येत आहे. आणि याचा शेवट विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर होईल यात शंका नाही.
संजय राऊतांचे यापूर्वीचे वक्तव्य, प्रेस कॉन्फरन्स बघितल्या तर त्यांनी नेहमीच राष्ट्रवादीला झुकते माप दिले आहे. त्यामुळे राऊत काही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाही, त्यांना आमच्या पक्षावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अजित पवारांनी राऊतांना चांगलेच खडसावले होते. मात्र शरद पवार आपले गुरू असल्याचे सांगत, आपण त्यांच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झाल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रवादीची आणि शरद पवारांची नेहमीच बूज राखणार्‍या संजय राऊतांना राष्ट्रवादी हा संपलेला पक्ष का वाटावा आणि तेही राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटकपक्ष असतांना. या लेखात राऊत म्हणतात पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच आहे. वास्तविक पाहता ठाकरे गटाच्या शिवसेनेची स्थापना होवून अनेक दशके उलटले तरी हा पक्ष, महाराष्ट्राच्या बाहेर विस्तार करू शकला नाही. ज्या महाराष्ट्रात भाजपपेक्षा शिवसेना वरचढ होती, त्या पक्षाचे आमदार जास्त होते, त्या पक्षाची सातत्याने खालावणारी परिस्थिती, कमी होणार्‍या जागा, एकेकाळी लहान भाऊ असणारा भाजप कधी मोठा भाऊ झाला हे शिवसेनेलाही कळले नाही, त्या शिवसेनेने राष्ट्रवादीला डिवचणे म्हणजे महाविकास आघाडीत बिघाडी करून, सर्वच पक्षांना बाहेर पडण्याचे संकेत यातून दिसून येत आहे.
शरद पवारांची देखील तीच सुप्त इच्छा असल्याचे दिसून येत आहे. मात्र महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्वतंत्र लढले तर, त्याचा थेट फायदा हा भाजपला होणार आहे, आणि तेच इतर पक्षांना हवे असल्याचे दिसून येत आहे. यामागचे राजकारण म्हणजे पुतण्या तुमच्या पक्षात येणार नाही, मात्र आम्ही बाहेरून तुम्हाला मदत करू, यादिशेने पवारनीतीचे राजकारण सुरू असल्याचा प्रत्यय येतांना दिसून येत आहे. आघाडी तुटली आणि प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडूका जिंकल्या की, भाजप हा नंबर वन पक्ष ठरेल, लोकसभेमध्ये 25 आणि विधानसभेमध्ये सत्तेच्या सोपानपर्यंत पोहचवेल, इतक्या जागा हा पक्ष मिळवेल यात शंका नाही. मात्र जर महाविकास आघाडीने एकत्र निवडणूका लढल्या तर, भाजपचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला ज्याप्रमाणे महाविकास आघाडी एकसंघ नको आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँगे्रसला आणि ठाकरे गटातील काही नेत्यांना देखील ही आघाडी नको आहे. 

COMMENTS