Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती 

अहिल्यानगर – राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास नुकतीच भेट देऊन महाआरती केली. मंदिराच्या ग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण १० एप्रिलच्या समारंभास स्थगिती
वडाळामहादेव येथे बिबट्याचे दर्शन; रहिवासी भयभीत
प्रशांत कोरटकरला जामीन नाहीच : कोर्टाने अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली
Displaying IMG_20250831_203139.jpg

अहिल्यानगर – राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास नुकतीच भेट देऊन महाआरती केली. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेऊन त्यांनी भक्तांना नमस्कार केला व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर परिसरात झालेल्या ढोलपथकात स्वतः ढोल वाजवून त्यांनी उत्सवाचा आनंद लुटला. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, सचिव अशोक कानडे, रंगनाथ फुलसौंदर, विजय कोथिंबिरे, चंद्रकांत फुलारी, हरिचंद्र गिरमे, संजय चाफे, माणिक विधाते, नितीन पुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

      सभापती प्रा. शिंदे यांनी महाआरतीनंतर शहरातील विविध मंडळांना भेट देऊन आरती केली. त्यांनी टू-व्हीलरवरून संपूर्ण शहरातील गणेश मंडळांना भेटी दिल्या व मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. शहरातील गणेशोत्सवात असणारा उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्य अनुभवून ते भावूक झाले.

     राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की,..अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश हे फक्त या शहराचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे श्रद्धास्थान आहे. या गणेशोत्सवामुळे लोकांमध्ये भक्तिभाव, एकोपा आणि सामाजिक जाणीव दृढ होत आहे. मंदिरात येताना मला विशेष आध्यात्मिक आनंद झाला. ढोलपथकात सहभागी होणे ही माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण आहे. श्री गणेशाच्या कृपेने नगरचे सर्व नागरिक सुखी, निरोगी व समृद्ध राहावेत, हीच माझी प्रार्थना आहे,” असे शिंदे यांनी नमूद केले.

      ते पुढे म्हणाले, “गणेशोत्सव हे आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. या उत्सवात तरुणाईने समाजहिताचे विविध उपक्रम राबवले पाहिजेत. नगरातील सर्व मंडळांनी सामाजिक संदेशावर आधारित देखावे उभारले आहेत, हे कौतुकास्पद आहे. मी संपूर्ण शहरभर जाऊन कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला आणि नगरकरांचे गणेशप्रेम अनुभवले. ग्रामदैवताच्या आशीर्वादाने नगरच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन.”

देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर म्हणाले की “आज राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विशाल गणेश मंदिरात आगमन करून महाआरती केली, हा सर्व नगरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या हस्ते झालेली आरती ही देवस्थान समितीसाठी आणि सर्व भक्तांसाठी मोठा सन्मान आहे. प्रा. शिंदे यांनी ढोल वाजवून आनंद व्यक्त केला, यामुळे उत्सवाची रंगत आणखीनच वाढली. मंदिराच्या कार्यात नगरकरांचा मोठा सहभाग असून हे मंदिर नगरच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक जीवनाचे केंद्रस्थान आहे,” असे आगरकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “ग्रामदैवताच्या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर समितीने भक्तांना सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आगामी काळात श्री विशाल गणेश मंदिराच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा आमचा संकल्प आहे.”प्रास्तविक प्रा माणिक विधाते  केले तर सूत्रसंचालन नितीन पुंड यांनी केले संजय चाफे यांनी आभार मानले.

COMMENTS