Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये भव्य दिव्य सर्वरोग मोफत महाआरोग्य शिबीर.

रुग्ण मित्र फाउंडेशन, ममता हॉस्पिटल व स्किनोवेशन क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने बीडमध्ये भव्य मोफत सर्वरोग आरोग्य शिबीर

बीड प्रतिनिधी - जिल्ह्यातील सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोफत व माफक दरात चांगली आरोग्य सेवा मिळावी व प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत उच्च दर्जाची ट्र

गोरेगावमध्ये भिंंत कोसळून दोघांचा मृत्यू
सहकार चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला
नवे सरकार जनतेच्या प्रश्नांना सोडवेल!

बीड प्रतिनिधी – जिल्ह्यातील सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोफत व माफक दरात चांगली आरोग्य सेवा मिळावी व प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत उच्च दर्जाची ट्रीटमेंट पोहचावी हाच ध्यास हाती घेऊन रुग्ण मित्र फाउंडेशन, ममता हॉस्पिटल, व स्किनोवेशन क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात लवकरच भव्यदिव्य मोफत व माफक शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. शिबीर दिनांक 09/ 04/ 2023 वार रविवार, ममता हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय समोर, नगर रोड, बीड, येथे आयोजन केले असून या शिबिरामध्ये येणार्‍या सर्व गरजु रुग्णांची मोफत शुगर व ब्लडप्रेशर तपासणी, मोफत केली जाणार आहे. तसेच उर्वरीत इतर मोठ्या आजारांच्या रक्त तपासणी मध्ये 50% सवलत दिली जाणार आहे. तसेच सोनोग्राफी, व इतर रक्त तपासणीत 50% सवलत दिली जाणार आहे. या शिबिरामध्ये येणार्‍या सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधींचे वाटप केले जाणार असुन, गंभीर आजारांच्या रुग्णांना माफक दरांमध्ये पुढील उपचारांमध्ये सवलत ही दिली जाणार आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर डॉ, योगेश सानप, (स्त्री रोग तज्ञ) डॉ, मोनिका सानप (बालरोग तज्ञ) डॉ, पुनम भालेराव (त्वचारोग तज्ञ) डॉ, निलेश सानप (जनरल फिजिशियन) डॉ, गीतांजली सानप (जनरल फिजिशियन) डॉ, महेश काळे (कॅन्सर तज्ञ) डॉ, संतोष जैन (रेडिओलॉजिस्ट) डॉ, तुषार खरमाटे (युरो सर्जन) इत्यादी तज्ञ डॉक्टरांकडून या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या भव्य दिव्य सर्वरोग मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजक रुग्ण मित्र फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित उर्फ (बाळासाहेब) धुरंधरे व सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र (भाईजी) डुलगज युवा प्रदेश अध्यक्ष रवीकिरण गिरी (गोसावी) यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये बीड जिल्ह्यातील गाव,वाडी, वस्तिवरील गरजू रुग्णांची घरोघरी जाऊन नाव नोंदणी करण्यात येत आहे. सर्व गरजु रुग्णांपर्यंत चांगली व मोफत आरोग्य सेवा पोहचावी याच करता आपण सतत प्रयत्नशील असून रुग्ण मित्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, मार्फत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन बीड शहरात विवीध आजारांवर केले जात आहे. त्यामुळे या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील व शहरातील सर्व गरजू रुग्णांनी आवश्यक लाभ घ्यावा असे रुग्ण मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी सांगितले आहे. या शिबिरासाठी मोठे परिश्रम घेणारे समाजसेवक विरेंद्र (भाईजी) डुलगज, युवा प्रदेश अध्यक्ष रवीकिरण गिरी (गोसावी), बीड शहर अध्यक्ष, विनोद चांदणे, पत्रकार,संजय देवा कुलकर्णी, रुग्ण मित्र, हणुमंत तोंडे, इत्यादी रुग्ण मित्र, व सदस्य पदाधिकारी, यांचे या शिबिरामध्ये मोठे परिश्रम आहेत.

COMMENTS