मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवत तब्बल दोन तृतीयांश आमदार आपल्या बाजूने वळवले. असे असतानाही उर्वरित आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवत तब्बल दोन तृतीयांश आमदार आपल्या बाजूने वळवले. असे असतानाही उर्वरित आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिले, अशा १५ आमदारांना ठाकरे यांनी स्व हस्ताक्षराने धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र नुकतेच पाठवले. ठाकरे यांनी पत्रात म्हटले की, जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दूधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे आपण दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनांना बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात. आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.
ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आमदार
बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांनंतर आदित्य ठाकरे, वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, नितीन देशमुख, कैलास पाटील आणि राहुल पाटील हे आमदार सध्या ठाकरेंसोबत म्हणजे मूळ शिवसेनेत आहेत.
COMMENTS