Homeताज्या बातम्यासंपादकीय

प्रेमविवाहाची परिणती हिंसाचार नव्हे!

 मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात खदखदत असणाऱ्या बापाने, पोटच्या मुलीवर आणि जाव‌ईवर गोळ्या झाडून, त्या दोघांचा खून करण्याचा प

नगर शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट…
किरण माने कधीही चुकीचे वागले नाही, त्यांनी मुलीप्रमाणं वागणूक दिली : श्वेता आंबीकर | LOKNews24
भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली मी इलायची दिली – शंभुराज देसाई

 मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात खदखदत असणाऱ्या बापाने, पोटच्या मुलीवर आणि जाव‌ईवर गोळ्या झाडून, त्या दोघांचा खून करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वत:च्या मुलीवरच आरपीएफमधून निवृत्त झालेल्या बापाने,  एका लग्नसोहळ्यात हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून मुलीचा खून केला. या गोळीबारात जावई  गंभीर जखमी झाला आहे. तर, घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला आहे. हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून त्यानी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली. तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे. कारण, ज्या समाज व्यवस्थेमध्ये आंतरजातीय विवाह वरून  मुलीचे आणि/किंवा जावयाचे खून पाडले जातात, अशा व्यवस्थेमध्ये, एकाच जात समूहातून असल्यानंतरही केवळ प्रेम विवाह केला म्हणून राग धरलेल्या घरच्यांनी, स्वतःच्या मुलीचा आणि तिच्या स्वप्नांमधील गोड संसार उभारणाऱ्या जावयाचा अशाप्रकारे खून करण्याचा प्रयत्न करणे, ही भारतीय समाजातील अतिशय भयावह आणि गंभीर बाब आहे. अर्थात, यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी अंमळनेर येथे देखील एकाच समाजातील प्रेमविवाह करणाऱ्या पती-पत्नीचा तिच्या माहेरच्या घरच्यांनी खून केला. या घटनेला पाच-सहा महिने होत नाही, तोच, जळगाव जिल्ह्यातीलच चोपडा येथे अशा प्रकारे मुलगी आणि जावई चा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मुलगी जागेवरच ठार झाल्याचं समोर आलं. जातिव्यवस्थेच्या अनुषंगाने होणारे प्रेम विवाह समाजामध्ये हिंसक होताना दिसतात किंवा ठरतात; परंतु, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन समाजाचे घटक म्हणून आपण वावरतो, तेव्हा त्याच समाजातून प्रेमविवाह करणाऱ्या सजातीय पती-पत्नींना ठार करण्याचा जो प्रयत्न केला गेला, किंवा केला जातो यापेक्षा भीषण मानावी अशी अन्य बाब कोणतीही असू शकत नाही! ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी जे सहा कार्यक्रम दिले, त्यामध्ये आंतरजातीय विवाह हा देखील एक मुख्य घटक आहे! परंतु, आंतरजातीय विवाहऐवजी जेव्हा सजातीय विवाह प्रेमातून होतो, तेव्हा देखील,  हिंसक घटना समाजात होत असतील तर, त्यापेक्षा अतिशय चिंतनीय आणि निषेधार्ह बाब अन्य कोणतीही असू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील जातीव्यवस्था नष्ट करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्यामध्ये प्रेमविवाहाची पूर्व अट असेल, हे मात्र नक्की! परंतु, जेव्हा सजातीय तरुण-तरुणींमध्येच प्रेम घडते आणि त्याचे रूपांतर विवाहात होतं आणि या प्रेमविवाहाच्या घटनेचे पडसाद त्यांच्या मृत्यूपर्यंत जातील, ही बाब अतिशय मनाला वेदना देणारी आणि तितकीच चीड आणणारी आहे. ऑनर किलिंग सारखी अतिशय धिकारार्ह बाब ज्या समाज व्यवस्थेमध्ये घडते, त्या समाज व्यवस्थेतील पालक आपल्याच पाल्यांचा असा भीषण खून केवळ अहंकारापाई करत असतील तर, अशा पालकांच्या मानसिकतेचं संदर्भात समाजाने अधिक गंभीर विचार करण्याची गरज आहे. आज, तरुण-तरुणी आकाशाला गवसनी घालत असताना जातीव्यवस्था न पाहता आपल्या भावी स्वप्नांना उभारण्यासाठी प्रेमविवाह करतात, अशा युवक युवतींना जीवानिशी ठार करणाऱ्यांना कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा व्हावी.

COMMENTS