Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकमंथन दैनिकाचा दणका प्रशाशनला जाग खासदार डॉ. भारती ताई पवार यांनी तातडीने घेतली दखल

निफाड :-  लासलगाव विंचूर १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल आणि गढूळ पाणीपुरवठा प्रकरणी निफाड शिव

मराठा समाजाला ईडबल्यूएस आरक्षण
अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट?
सैन्य माघारीनंतरही भारत-चीनमध्ये तणाव

निफाड :-  लासलगाव विंचूर १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल आणि गढूळ पाणीपुरवठा प्रकरणी निफाड शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री भारतीताई पवार यांनी तातडीने दखल घेऊन पाहणीसाठी सहाय्यक डॉ.उमेश काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक शाखा अभियंता प्रताप स.पाटील, शाखा उपअभियंता एस.वाय.निकम, सहाय्यक अभियंता मिलिंद भामरे यांचे पथक पाठवले. अधिकाऱ्यांच्या पाहणीत या योजनेचा विंचूर येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्प अतिशय दुर्दशा झालेल्या अवस्थेत आढळून आला. शुद्धीकरण योजनेची अत्याधुनिक यंत्रणा तुटलेल्या अवस्थेत बंद होती तसेच तेथील विद्युत पंपही गंजलेल्या अवस्थेत बंद आढळून आले. टीसीएल मिक्सर बंद अवस्थेत होते. पाणी शुद्धीकरणासाठी असलेल्या सेटलमेंट टँकमधील युनिट कित्येक वर्षापासून बंद असल्याचे निदर्शनास आले तसेच पाणी शुद्धीकरण करण्यासाठी असलेली वाळू बदलली नसल्याने फिल्टर ब्रेड खराब झाले आहे. बॅक वॉश वॉटर उपकरण व क्लोरीन गॅस युनिट देखील बंद असल्याने धुळखात पडलेले आहे. त्यामुळे या योजनेतून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस कर्मचाऱ्यांना प्रकाशासाठी कुठल्याही प्रकारची बल्ब ट्यूब नळी लाईटची व्यवस्था नाही अशी तसेच तीन महिन्यापासून पगार देखील नाही अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. अंधारातच सर्व व्यवस्था बघावी लागते त्यात रात्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात साप लांडगे व बिबट्यांचे प्रमाण या भागात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील अतिशय तुटपुंज्या पगारावर जीव धोक्यात घालून नोकरी करावी लागते. या सर्व बाबींवर डॉ भारतीताई पवार यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडेही प्रकाश पाटील यांनी नियोजनासंदर्भात कैफियत मांडली होती. त्यानंतर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल मॅडम यांनी ऑक्टोबर २०२२मध्ये योजनेची पाहणी 

करून पाणी शुद्धीकरणाच्या सर्व यंत्रणा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरी देखील सहा महिने होऊन गेले कुठलीही यंत्रणा सुरू नाही फक्त  पाच सहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू होता, मात्र तो अशुद्ध स्वरूपात तसेच मात्र गेल्या २३ ते २५ दिवसापासून पूर्ण पाणी पुरवठा बंद होता कामात  

दिरंगाई करून नागरिकांच्या आरोग्याबरोबर खेळणाऱ्या समितीच्या सचिवावर कडक कारवाई करावी व नवीन अधिकारी 

नेमणूक करून नागरिकांना शुद्ध

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे 

किमान दिवसाआड करावा यासाठी  १ मे महाराष्ट्रदिनी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय

आवारात बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार शिवसेना निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केला   आहे.

COMMENTS