Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले व राजूर न्यायालयात उद्या लोकअदालत

अकोले ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने अकोले व राजूर न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व अकोले तालुका वकील बार असोसिएशन यांच्य

महिलेची छेड काढणार्‍यास सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’बँकेमध्ये तपासणी | DAINIK LOKMNTHAN
प्रथमेश टेके याने वारीच्या नावलौकिकत घातली भर ः प्रकाश गोर्डे

अकोले ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने अकोले व राजूर न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व अकोले तालुका वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले व राजूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात उद्या शनिवारी (27 जुलै) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन अकोले तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड वसंतराव मनकर यांनी केले. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, बँका व वित्तीय संस्था तसेच शासकीय आस्थापनांची थकीत वसुलीबाबतची दाखलपूर्व प्रकरणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.

COMMENTS