फेसबुकवर अवैध धंद्याच्या लाईव्ह शूटींगने पोलिसांसमोर आव्हान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फेसबुकवर अवैध धंद्याच्या लाईव्ह शूटींगने पोलिसांसमोर आव्हान

अहमदनगर/प्रतिनिधी : त्याने शर्टची वरची दोन बटणे खुली केली आणि हातात सिगारेट घेऊन तो दारात उभा राहिला…त्याला पाहिल्यावर तो आपलाच समजून आत घेतले गेले…आ

विखे यांना मंत्रिपद मिळताच पाथर्डीत जल्लोष
नगरच्या विकासासाठी कुणाशीही आघाडी करायला आम्ही तयार-खासदार सुजय विखे | आपलं नगर | LokNews24 |
आश्रमशाळा कर्मचार्‍यांचा जुन्या पेन्शनसाठी संप सुरूच

अहमदनगर/प्रतिनिधी : त्याने शर्टची वरची दोन बटणे खुली केली आणि हातात सिगारेट घेऊन तो दारात उभा राहिला…त्याला पाहिल्यावर तो आपलाच समजून आत घेतले गेले…आणि आत रंगात आलेल्या पत्त्यांच्या डावाचा लाईव्ह शो त्याने मोबाईलद्वारे फेसबुकवर सुरू केला…पाचशेच्या नोटांच्या थप्पी व पत्ते पिसून ते वाटण्याचे कौशल्य याची देही याची डोळा जगभरातील दर्शकांनी अनुभवले…नगरच्या निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप भांबरकर यांचा हा नगर शहरातील अवैध धंद्यांचा लाईव्ह शो अनेकविध प्रतिक्रिया सोशल मिडियात उमटवून गेल्या…अनेकांनी त्याच्या धाडसाबद्दल कौतुक केले व त्या काळजी घेण्याचा सल्लाही आवर्जून दिला. दरम्यान, शहरातील अवैध धंद्यांचे लाईव्ह शूटींग सोशल मिडियातून आल्याने पोलिसांसमोर हे अवैध धंदे रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा खेळला जातो. मात्र, या सट्ट्यात पैसे गमावल्याने निराश झालेल्या तसेच घरच्यांना समजले तर काय होईल, या भीतीने नगर शहरातील 7 ते 8 मुलांनी आत्महत्या केल्याचे संदीप भांबरकरचे म्हणणे आहे. यामुळे सट्टेबाजीने तसेच पत्ते, जुगार व अन्य अवैध धंद्यांमुळे युवा पिढीचे भविष्य अंधारात जात असल्याने शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी भांबरकर याने पोलिसांकडे केली होती. या कारवाईसाठी पाच दिवसांची मुदतही दिली होती. पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संदीपने धाडस करून कायनेटीक चौकातील एका पत्त्याच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला व तेथे पत्ते खेळण्याचा बहाणा करून कुशलतेने तेथील सारे चित्रीकरणफेसबुकवर लाईव्ह केले. त्यानंतर टिळकरोडवरीलही एका अड्ड्यावर जाऊन तेथील असे चित्रीकरण त्याने लाईव्ह केले. फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करून पोलिसांच्या कामावर यातून प्रश्‍नचिन्ह संदीपने उभे केले आहे.

आज पुन्हा फेसबुक लाईव्ह
नगर शहरातील अवैध धंदे बंद केले नाही तर असेच फेसबुक लाईव्ह संपूर्ण नागरकरांना आणि पोलिसांनाही दाखवण्यात येतील असे आव्हान पुन्हा भांबरकर याने दिले आहे व शुक्रवारी नगर शहरातील 12 ठिकाणच्या अवैध धंद्यांचे फेसबुक लाईव्ह करण्याचाही इशारा दिला आहे.

COMMENTS