Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देवून गौरविण्यात यावे – मदन हातागळे,साईनाथ अडागळे

गेवराई प्रतिनिधी - महाराष्ट्र  शासनाने साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करन्यात यावा  तसेच सर्व शासकीय / न

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील : डॉ. भागवत कराड
शासकिय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती बंधनकारक
सातारा जिल्ह्यात आरटीई अंतर्गत 1,483 विद्यार्थ्यांचे प्रवेश

गेवराई प्रतिनिधी – महाराष्ट्र  शासनाने साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करन्यात यावा  तसेच सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करून अभिवादन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्हाउपाध्यक्ष मदन हतागले आणि युवा तालुकाध्यक्ष साईनाथ हतागळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

लोकशाहीर, साहीत्य रत्न, आण्णाभाऊ साठे यांनी देशासाठी व समस्त समाजासाठी आपला देह झिजवला आहे. त्यांच्या साहित्यामधून समाजाची सत्य परिस्थिती  जगासमोर मांडण्यात आली असून, पिडीत, शोषीत, वंचित घटकासाठी त्यांचे कार्य हे मोलाचे आहे. यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात यावे अशी मागणी डेमोक्रॉटीक पार्टी ऑफ इंडीया (डीपीआय) व समस्त मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कडे जिल्हाधिकर्‍यांमार्फत  करण्यात येत असून, येत्या 1 ऑगस्ट रोजी साहित्य रत्न आणाभाऊ साठे यांची जयंती ही जिल्हयातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी, ज्या कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली नाही असे निदर्शनात आल्यास त्या कार्यालय व कार्यालय प्रमुखा विरुद्ध योग्य ती कार्यवाही करन्यासाठी डी.पी. आय. मार्फत आपणा कडे निवेदन सादर करण्यात येवून त्यांच्या विरुध्द कार्यवाही करण्याची मागणी होईल याची दखल घेवून  जयंती दिनी ’ड्राय डे पाळण्यात यावा असे ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मदन  हतागळे  जिल्हा उपाध्याक्ष डेमोक्रॉटीक पार्टी ऑफ इंडीया,साईनाथ अडागळे, पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे अध्यक्ष तुळशीराम वाघमारे हे उपस्थित होते.

COMMENTS