Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्यातून मिळते विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेण्याचे सामर्थ्य – डॉ. प्रकाश कोल्हे  

  नाशिक - २४ वे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित वाडीवऱ्हे, नाशिक येथे सोमवार दि २७ नोव्हेंबर  रोज

मुंबईत ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ होणार : मंत्री उदय सामंत यांची घोषणा
विरारमध्ये रुग्णालयात आग, १३ रुग्णांचा मृत्यू
ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी नाहीच

  नाशिक – २४ वे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित वाडीवऱ्हे, नाशिक येथे सोमवार दि २७ नोव्हेंबर  रोजी संपन्न झाले. साहित्याच्या वाटेवर प्रवास करताना ग्रामीण विकासासाठी या साहित्य संमेलनाचा उपयोग तळागाळातील सामान्य माणसापर्यंत होऊन सुसंस्कृत समाजाची मोट बांधण्यास नक्कीच उपयोग होईल. या साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे परमभाग्य एक साहित्यिक म्हणून शैक्षणिक चळवळीतील योगदानाबद्दल मला लाभले.या साहित्य संमेलनातून नक्कीच ग्रामीण भागातील विकासासाठी दिशा प्राप्त होईल. यावेळी  इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे अध्यक्ष व संमेलनाचे आयोजक मा श्री पुंजाजी मालुंजकर, उद्घाटक डॉ प्रशांत भरवीरकर, संमेलनाध्यक्ष मा संजय वाघ, प्रमुख अतिथी न्यायमूर्ती वसंत पाटील, मा श्री  सावळीराम तिदमे, मा ऋता ठाकूर, श्री तुकाराम धांडे, प्रा. आशा पाटील, प्रा देविदास गिरी स्वागताध्यक्ष मा श्री बाणेश्वर मालुंजकर इ. मान्यवरांचा सहवास या संमेलनाच्या माध्यमातून लाभला.

       मौलिक ज्ञानसंपदा कलेच्या कोंदणात सामावून उत्कृष्ट कलाविष्कारांचा प्रत्यय या संमेलनाच्या निमित्ताने आला. शब्द काय करतात ? तर ते जगायला आधार देतात आणि आकाशात उडायला बळ देतात. अस्तित्वाची जाण देतात आणि विश्वाला स्वतःत सामावण्याचे सामर्थ्य देखील देतात. अशा शब्दांच्या दुनियेत जगायला मला नेहमीच आवडते. म्हणून अशा साहित्यांचा मेळा आणि साहित्यिकांची भेट माझ्यासाठी पर्वणीच! 

        ज्ञानाचा हा साक्षात्कार सर्वांनाच होवो, साहित्याच्या वाटेवर प्रवास करण्यास सर्वच उद्युक्त होवोत, यातच या संमेलनाचे साफल्य आहे. 

COMMENTS