Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाने प्रभावित झालेल्या पिकांचे पंचनामे करा

आमदार पाचपुते यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

श्रीगोंदा : राज्यभरासह श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून, श्रीगोंदा तालुक्यातील उडीद, कांदा, कपाशी आदी पिकांचे

खोटे बोलणे आपली संस्कृती नाही: आमदार रोहित पवार
कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिव्हीर व ऑक्सिजन राखीव ठेवा : नगराध्यक्ष वहाडणे
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

श्रीगोंदा : राज्यभरासह श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून, श्रीगोंदा तालुक्यातील उडीद, कांदा, कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे या प्रभावित झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी या मागणीचे निवेदन आमदार पाचपुते यांच्या वतीने तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, नितीन नलगे, विठ्ठल चव्हाण, गणेश लगड, आदित्य अनवणे यांनी दिले.
मागील आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पेरलेला कांदा, उडीद, कापूस आदी पिके मोठ्या प्रमाणात पावसाने प्रभावित झाली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या नुकसान ग्रस्त पिकांची महसूल व कृषी विभागाच्या वतीने संयुक्त पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.

आवर्तनातून शेततळे व पाण्याचे श्रोत भरुन घ्यावेत ः विक्रम पाचपुते
सध्या कुकडी धरण क्षेत्रात पावसाच्या पाण्याची चांगल्या प्रकारे आवक असून येडगाव धरणातून ओहरफ्लोचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनातुन शेततळे व पाण्याचे श्रोत भरून घ्यावेत असे आव्हान भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनी केले आहे.

COMMENTS