Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पावणेतीन कोटींची दारू जप्त

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बेकायदा दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम हाती

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच
ग्रामीण भागातील तरुणीच्या कलेची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये नोंद
दृष्काळसदृष्य परिस्थितीचे सावट जाऊन भरपूर पाऊस होऊ दे.

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बेकायदा दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाने दोन कोटी 81 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने 1 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत 426 गुन्ह्यांची नोंद केली, तसेच 411 आरोपींना अटक केली. या कारवाईत 20 हजार 675 लिटर गावठी दारू, 761 लिटर देशी मद्य, 18 हजार 295 लिटर विदेशी मद्य, 138 लिटर बिअर, 1 हजार 823 लिटर ताडी, 36 वाहने असा दोन कोटी 81 लाख 91 हजार 349 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराइतांविरुद्ध चांगल्या वर्तणुकीबाबत बंधपत्र घेण्यात आले आहे. बंधपत्रासाठी दाखल 442 प्रस्तावांपैकी 248 जणांचे बंधपत्र घेण्यात आले आहे. एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार बेकायदा मद्य विक्री करणार्‍यांविरुद्ध, तसेच बेकायदा मद्य सेवन करणार्‍या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून 203 गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी 468 आरोपीना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 170 आरोपींना दोषी ठरविले. प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही अशा आरोपीविरुद्ध एमपीडीए कायदा 1981 अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल 48 प्रकरणात पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून 10 आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांनी दिली.

COMMENTS