Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहा वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम पूर्ण : आ.आशुतोष काळे

कोपरगाव : सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राला जोडण्याचे लिंक लाईनचे काम पूर्ण झाले

दिग्गज मल्ल घडविणार्‍या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका !
डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले
एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सत्कार

कोपरगाव : सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राला जोडण्याचे लिंक लाईनचे काम पूर्ण झाले असून लवकरच चासनळी वीज उपकेंद्राला शहा वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. 

माजी आमदार अशोकराव काळे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागाच्या गावातील तसेच सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी १३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करून आणले होते. हे वीज उपकेंद्र कोपरगाव मतदार संघातच उभारले जाणार होते परंतु ते सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आले. कृषी मंत्री ना. माणिकराव कोकाटे व आ.आशुतोष काळे यांनी संयुक्तपणे या वीज उपकेंद्राच्या कामाला चालना दिल्यामुळे हे शहा येथील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्र कार्यान्वित झाले होते. तेव्हापासून या वीज उपकेंद्रावरून कोपरगाव मतदार संघातील कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी वीज उपकेंद्र १३२ के.व्ही. उपकेंद्राला जलद गतीने जोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कार्यकारी अभियंता थोरात यांना जानेवारी महिन्यात दिल्या होत्या. तेव्हापासून शहा येथील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रावरून चासनळी लिंक लाईनचे काम शीघ्र गतीने सुरु असल्यामुळे शहा उपकेंद्रातून ३३/११ केव्ही चासनळी उपकेंद्रापर्यंत १७ कि.मी. वाहिनीचे काम पूर्ण असून लवकरच चासनळी वीज उपकेंद्राला शहा वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरु होणार आहे. 

त्यामुळे कोपरगाव शहरातील १३२ के.व्ही. सबस्टेशनवर पडणारा अतिरिक्त भार कमी होऊन वीजपुरवठा सुरळीत होणार असून कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघणार आहे. तसेच वारंवार रोहित्र नादुरुस्त होणे व शेतकऱ्यांचे वीजपंप जळणे आदी समस्या सुटणार आहे.  शहा वीज उपकेंद्राला चासनळी उपकेंद्रा बरोबरच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव उपकेंद्र देखील जोडली जाणार जाणार असून या वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे त्याचा फायदा या उपकेंद्रा अंतर्गत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील घरगुती व कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर कोपरगाव उपकेंद्राचा भार कमी झाल्यामुळे कोपरगाव तालुक्याचा देखील वीजपुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे चासनळी उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या चास हंडेवांडी कारवाडी व परिसरातील गावातील शेतकरी, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. शहा १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राला जोडण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे कोणत्याही क्षणी वीजपुरवठा सुरु होणार असल्यामुळे सदर वीज वाहिनीशी नागरीकांनी आपला कोणत्याही प्रकारे संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. 

COMMENTS