बीड । प्रतिनिधीऊन, वारा, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणार्या लाईनमनच्या क
बीड । प्रतिनिधी
ऊन, वारा, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणार्या लाईनमनच्या कष्टाचा गौरव करण्यासाठी आज 4 मार्च रोजी बीड शहर उपविभागीय कार्यालयात ’लाईनमन दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासनाकडून लाईनमनच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, वीज क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या ’लाईन स्टाफ’च्या सन्मानासाठी देशभरात 4 मार्च हा दिवस ’लाईनमन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बीड शहरात आयोजित कार्यक्रमात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिवाची बाजी लावणार्या सर्व महिला व पुरुष लाईनमनचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता श्री. सुबोध डोंगरे होते. यावेळी प्रशासकीय अधिकारी व अभियंत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, ज्यात प्रामुख्याने श्री. चव्हाण साहेब (अतिरिक्त कार्यकारी अभियंता), श्री. पवार साहेब (उपकार्यकारी अभियंता) श्री. राठोड, श्री. जाधव, श्री. गोचडे, श्री. नलावडे (सहाय्यक अभियंता), श्री. अमोल काळे (व्यवस्थापक) कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ तंत्रज्ञ शेख अमीर मदनी यांनी लाईन स्टाफच्या विविध समस्या आणि कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेबाबत आपले मनोगत मांडले. कर्मचार्यांच्या या समस्यांची दखल घेत उपस्थित वरिष्ठ अधिकार्यांनी त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याची आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची हमी दिली. जनतेच्या घरापर्यंत प्रकाश पोहोचवण्यासाठी लाईनमन ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावतात. त्यांच्या या समर्पणाचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासन, महावितरण बीड यांनी व्यक्त केले. या सोहळ्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून, आपल्या कामाची दखल घेतली जात असल्याबद्दल कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS