।संगमनेर : विधानसभेच्या निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रात बदल झाला आहे, सध्या केंद्रात डबल इंजिन तर राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. ज्याप्रमाणे
।संगमनेर : विधानसभेच्या निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रात बदल झाला आहे, सध्या केंद्रात डबल इंजिन तर राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. ज्याप्रमाणे मध्य प्रदेश मध्ये लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला, असाच चमत्कार महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीने केला. असे मत केंद्रीय कृषिमंत्री आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषिमंत्री तथा ग्रामीण विकासमंत्री शिव राजसिंह चौहान यांनी शिर्डी शनिशिंगणा पुढचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर ला जाताना संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर ते काही वेळ थांबले होते. यावेळी संगमनेर तालुक्याच्या वतीने आ. अमोल खताळ यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी व्यास पीठावर भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, आदीभाजप शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ना. चौहान म्हणाले की केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ हजार ८०० कोटी रुपयांच्या पीक विमा जमा झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. परदेशातून आलेले नवीन तत्रज्ञान, तसेच शेतकरी आपल्या शेतात करत असलेल्या विविध प्रयोगामुळे शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन होत आहे. त्या माध्यमातून देशातील शेतक ऱ्यांचे जीवनमानही उंचावेल. देशातील गोर गरिबांना गरीबांना घरे देणार सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणार आहे, सरकार तुमच्यासोबत आहे ग्रामीण भागाचा विकास करणार आहे, ग्रामीण भागात २ कोटी रुपये करण्याचा सरकारचा मानस आहे.
COMMENTS