संगमनेर तालुक्यात 2933 लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले जमा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर तालुक्यात 2933 लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले जमा

।संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्रत्यक्ष गावात भेट देऊन प्राप्त करण्यासाठी गावपातळीवर शिबिरे घेण्याचे आदेश महसू

कोपरगावमध्ये महसूल विभागाच्या विरोधात शेतकरी आक्रमक
वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकाकडून एक लाखाच्यावर दंड वसूल
विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या l LokNews24

।संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्रत्यक्ष गावात भेट देऊन प्राप्त करण्यासाठी गावपातळीवर शिबिरे घेण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महसूल यंत्रणेला दिले. त्यानुसार राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमोल निकम यांनी तालुक्यातील 10 मंडळातील गावांत शिबिरे घेण्याचे नियोजन केले. शिबिराबाबत गावपातळीवर आवश्यक प्रसिद्धी देण्यात आली.
29 व 30 सप्टेंबर या दोन दिवसात गावपातळीवरील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत झालेल्या शिबिरांच्या माध्यमातून तब्बल 2 हजार 933 लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. या लाभार्थ्यांना प्रतिमहा एक हजार रुपये तर लाभार्थी महिला विधवा व तिला एक अपत्य असल्यास 1100 रुपये, विधवा महिलेचे दान अपत्य असल्यास 1200 रूपये अर्थसहाय्य शासनाकडून दिले जात असते. लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ देताना दरवर्षी हयातीचा दाखला महसूलयंत्रणेकडून तपासला जातो. ज्यांचे हयातीचे दाखले प्राप्त नसतील त्यांचे अनुदान तात्पुरते बंद करण्यात येते. सामाजिक विशेष सहाय्य योजनेत संजय गांधी निराधार योजना 4830 श्रावण बाळ निराधार अनुदानयोजना 9693 इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी विधवा अनुदान योजना 3754 असे एकूण 18277 लाभार्थी तालुक्यात आहेत. या लाभार्थ्यांना दरमहा 1 कोटी 53 लाख रूपयांचे अनुदान दरमहा वर्ग करण्यात येते. मागील वर्षी अनुदानापोटी 18 कोटी 67 लाख रुपये वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील 18277 लाभार्थ्यांपैकी सुमारे 3300 लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त नसल्यामुळे त्यांना अनुदान वितरित केले जात नव्हते. त्यामुळे संगमनेर मधील 10 मंडळातील संगमनेर, घुलेवाडी, समनापुर, निळवंडे, तळेगांव, निमोन, कनोली, मनोली, शिबलापुर, आश्वी बू, अश्रि्व खू, जोर्वे, पिंपरणे,पिंपळगाव देपा,निमगाव जाळी, साकुर, डोळासने, धांधरफळ, बोटा,चंदनापुरी, घारगाव गावांत शिबिरे घेण्यात आली. दोन दिवसांच्या शिबिरात 2 हजार 933 लाभार्थ्यांचे हयातीचे व उत्पन्नाचे दाखले प्राप्त करून घेण्यात आले. यामध्ये बहुतांश लाभार्थी वयस्कर व दिव्यांग होते. या शिबिरात उपस्थित असलेल्या लाभार्थी यांनी त्यांच्या गावातच असे शिबीर आयोजित केले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. उर्वरित सुमारे 400 लाभार्थ्यांमध्ये काही स्थलांतरित व काही मृत असल्याचे आढळून आले. सदरच्या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी संगायो नायब तहसीलदार राजेश पौळ, संजय गांधी योजना शाखेतील सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. शिबिराच्या ठिकाणी सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व पोलीस पाटील हे हजर होते.

COMMENTS