खा.विखे यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू -: माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.विखे यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू -: माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

अभिजित खंडागळे/पाथर्डी : खासदार सुजय विखे पाटील यांनी पाथर्डी शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळे अनेक प्रलंबित विकासकामे करता आली.पुढील काळातह

बेलापूरकर डेंग्यु, चिकनगुनियाने त्रस्त
डॉ. शुभम कांडेकर आणि चैतालीताई खटी पुरस्कार
गोकुळधाम गोरक्षा केंद्राचे गो सेवा कार्य प्रेरणादायी

अभिजित खंडागळे/पाथर्डी : खासदार सुजय विखे पाटील यांनी पाथर्डी शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळे अनेक प्रलंबित विकासकामे करता आली.पुढील काळातही त्यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. खासदार सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक निधीतून संस्कार भवन ते धामणगाव रोड रस्ता कॉंक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक बसवणे या पूर्ण झालेल्या कामाचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आजपाहणी केली.तर या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. संस्कार भवन ते धामणगाव रस्ता मागील काही वर्षापासून पूर्णपणे नादुरुस्त झाला होता.त्या रस्त्यावर पडलेल्या खड्डामुळे अनेक नागरिक जखमी झाले होते.तसेच तेथील गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वनदेव परिसरात फिरायला जाणाऱ्या व परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता.ही गोष्ट आव्हाड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खासदार विखे यांना हा रस्ता कॉंक्रिटीकरण करावा अशी मागणी केली.विखे यांची मंजुरी आल्यानंतर त्यांच्या निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात आले.रस्त्याचे काम चालू असताना आव्हाड यांनी वेळोवेळी कामाची पाहणी केली.रस्ता पूर्ण झाल्याने फुलेनगर,भगवाननगर येथील नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने शहरवासीयांच्या वतीने अभय आव्हाड यांनी खा. विखे आभार मानले.

COMMENTS