Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १: राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन सुसज्ज करणे ही राज्य शास

नोबेल पारितोषिकाचे पंतप्रधान मोदी दावेदार – असल तोजे
महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी
पुण्यात झिका विषाणूचे 7 रुग्ण आढळले

बारामती, दि. १: राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन सुसज्ज करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नातून आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

पोलीस उपमुख्यालय बऱ्हाणपूर येथे पोलीस विभागाकरीता ४ स्कॉर्पिओ वाहनांचे लोकार्पण तसेच तालुक्यातील नागरिकांना त्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक पकंज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बऱ्हाणपूरचे सरपंच बाळासाहेबत चांदगुडे आदी उपस्थित होते.

COMMENTS