Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडाळामहादेव येथे बिबट्याचे दर्शन; रहिवासी भयभीत

श्रीरामपूर - तालुक्यातील वडाळामहादेव येथे बिबटयाची दहशत सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी येथील शेतकरी शरद पवार यांच्या ऐन ट्रॅक्टर समोर बिबटय

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री फडणवीस
अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार
औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध

श्रीरामपूर – तालुक्यातील वडाळामहादेव येथे बिबटयाची दहशत सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी येथील शेतकरी शरद पवार यांच्या ऐन ट्रॅक्टर समोर बिबटया आला. ट्रॅक्टरवर झेप घेण्याच्या तयारीत होता, मात्र प्रसंगावधान दाखवल्याने तो माघारी गेला. त्यामुळे या भागातील रहिवाशी भयभीत झाले असून वनविभागाने याठिकाणी तातडीने पिंजरा बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
      वडाळामहादेव येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचे जवळ शरद पवार यांची शेती असून दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ते आपले नांगरटीचे काम आटोपून ट्रॅक्टरवर घराकडे जात होते. या भागात जलसंपदा विभागाची माेठया प्रमाणावर पडीक जमीन असून येथे बिबटयाला लपण्यासाठी भरपूर जागा आहे. काही अंतर गेल्यानंतर ट्रॅक्टरचे थेट समाेर येवून बिबट्या उभा राहिला. अचानक बिबट्या समोर आल्याने ते गडबडले. बिबट्या थेट ट्रॅक्टरवर झेप घेण्याच्या तयारीत होता. मात्र प्रसंगावधान राखून शरद पवार यांनी जाेरजाेरात ट्रॅक्टर रेस केला, जोरात हाॅर्न वाजविल्याने या आवाजाला घाबरून बिबट्या माघारी असलेल्या झुडपांमध्ये गेला.
या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबटयाची दहशत सुरु आहे. अनेक शेळया, कुत्रे यांच्यावर बिबटयाने हल्ला करुन त्यांचा बळी घेतलेला आहे. बिबटयाच्या भितीने येथील रहिवाशी हे सध्या घराच्या बाहेरही निघत नाहीत. शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीजपुरवठा हाेत असल्याने शेतीला पाणी देण्यातही शेतकऱ्यांना माेठया अडचणींना सामाेरे जावे लागत आहे.
            वनविभागाकडे अनेकदा पिंजऱ्याची मागणी करण्यात येवूनही त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. पिंजऱ्याची मागणी केली की एक तर ताे उपलब्ध नसताे, किंवा शेतकऱ्यांनी स्वत: खर्च करुन नेण्याचे वनविभागाचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे वनविभागाला याप्रश्नी कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
त्यातच तालुक्याच्या अनेक भागात पकडलेले बिबटे हे वनविभागाचे कर्मचारी दूर जंगलात अथवा राेपवाटिकेत न पाठवता जवळपासच साेडत असल्याने बिबटयांची संख्या ही आहे तशीच राहणार असल्याची चर्चा या भागात आहे. त्यामुळे वनविभागाने येथील रहिवाशांचा अंत न पाहता तातडीने पिंजरा देण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

COMMENTS