नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील मुक्ताई ढाब्याजवळ मिना शाखा कालव्यालगत एक बिबट्या गुरुवारी (दि 4) पहाटे मृतावस्थेत आढळून आला.

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील मुक्ताई ढाब्याजवळ मिना शाखा कालव्यालगत एक बिबट्या गुरुवारी (दि 4) पहाटे मृतावस्थेत आढळून आला. पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात वाहनाने या बिबट्याला ठोकर दिली असावी असा अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात गेल्या चार वर्षात सुमारे सहा ते सात बिबट्यासह वन्यप्राणी अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडले आहेत.
COMMENTS