Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुर्शतपूर शिवारात आढळले बिबट्याचे बछडे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे रविवारी दहा वाजेच्या दरम्यान शेतात शेतकरी पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याचे बछडे

वंचितासाठी लढा उभा करणाऱ्या संघर्ष योद्धाचा प्रवास थांबला
Sangamner : कोरोना लसीकरणाबाबत प्रबोधनात्मक जनजागृती | LokNews24
आईवडिलांमुळे प्रथम क्रमांक मिळाला ः कु. अश्‍विनी काळे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे रविवारी दहा वाजेच्या दरम्यान शेतात शेतकरी पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याचे बछडे आढळून आले. बिबट्याचे पिल्लू असल्याने त्यांनी आजूबाजूला पाहिले मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी ही माहिती सरपंच साधनाताई दवंगे व डॉ. अनिल दवंगे यांना दिली.

डॉ. अनिल दवंगे यांनी वन विभागाची संपर्क साधत बिबट्याचे बछडे सापडले असल्याची माहिती वनविभागाला दिली. गेल्या अनेक दिवसापासून मुर्शतपूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत होते मात्र अचानक बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरात बिबट्या असल्याची खात्री पटली आहे. या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी काळे कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, शेतकरी संघाचे  संचालक रामदास शिंदे व विष्णू शिंदे यांनी केली आहे. नानासाहेब संपत शिंदे त्यांच्या शेतात सर्वे नंबर 67 मध्ये हे पिल्लू आढळून आले.हिरालाल शिंदे ,शांतीलाल शिंदे, कैलास शिंदे, राहुल उगले यांनी या पिल्लाला ताब्यात घेण्यासाठी आजूबाजूला असलेल्या शेतकर्‍याला आवाज दिला असता विष्णूआबा शिंदे, जालिंदर शिंदे, सुनील दवंगे ,काका शिंदे, सुनील घुले, दत्तात्रेय चौधरी, श्री मोरे, सचिन वढने, माणिक शिंदे,जालु शिंदे यांनी बिबट्याचे पिल्लू पकडण्यास मदत केली. वन विभागाच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना वनविभागाचे कर्मचारी श्री जाधव यांनी भ्रमणध्वनी द्वारे  हे बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती दिली.शेतकर्‍यांनी पकडलेले पिल्लू पुन्हा शेतात सोडले जाणार असल्याचे श्री जाधव यांनी सांगितले. आईची आणि पिल्लाची ताटातून होऊ नये म्हणून हा निर्णय घ्यावा लागतो असे त्यांनी सांगितले.मात्र शेतकरी धास्तावले असून या परिसरात अजूनही दोन बछडे व मादीसह नर असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पाईन परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी काळे कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, रामदास शिंदे व विष्णू शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS