Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खिर्डी गणेशमध्ये बिबट्याचा संचार

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथिल खिरडकर वस्ती येथे बिबट्याने कालवडीवर हल्ला करुन जखमी केल्याने परिसरात बिबट्याची दहशत नि

अविकासाच्या अपप्रवृत्तींचा नाशासाठी खड्डे रूपी रावणाचे दहन
30 कोटी किमतीच्या साकुर पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ
मनपातील महाविकास आघाडीला बसणार झटका ; काँग्रेस आणणार मंगळवारी आसूड मोर्चा

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथिल खिरडकर वस्ती येथे बिबट्याने कालवडीवर हल्ला करुन जखमी केल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


खिरडकर वस्ती येथे राञी बिबट्याने कालवडीवर हल्ला केला जनावरांच्या ओरडल्यामुळे कामगार जागे झाल्याने बिबट्याने  जवळच असलेल्या  शेतात धूम ठोकली  सदर ठीकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे उमटले  आहे सध्या ऊसाचे क्षेत्र तुटल्याने बिबटे मानवी वस्तीत शिरल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी महिला, मजूर वर्ग व ग्रामस्थ चांगलेच धास्तावले असून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे वनविभागाने या भागात त्वरित पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS