Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधिमंडळाचे आजपासून अधिवेशन

विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे, मात्र त्याआधी विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी सुरूवात होत आहे. मंग

पुण्यभूमी चे मुख्य संपादक बाळासाहेब मस्के व केज प्रतिनिधी रोहण गलांडे यांच्या वरील गुन्हे माघे घ्या
कुंभार समाजाच्या राज्यस्तरीय वार्षिक सभेत विविध ठराव संमत
माजी गृहमंंत्री देशमुखांना नागपूरला जाण्यास परवानगी

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे, मात्र त्याआधी विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी सुरूवात होत आहे. मंगळवारी 27 फेबु्रवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यात मोठ्या आर्थिक तरतुदीच्या कोणत्याही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता नाही. मात्र त्यापूर्वीच रविवारी विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत अधिवेशनातील खडाजंगीचे संकेत दिले आहे.
राज्याला उद्धवस्त करण्याचा, खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम सरकारकडून सुरू आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीने या फसव्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची भूमीका घेतली असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. अधिवशेनाच्या पूर्व संध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधीमंडळातील काँगेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख, शिवसेनेचे सुनिल प्रभू, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे. परंतु या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली असून राज्याच्या आदर्श, सुसंस्कृत राजकीय परंपरेला गालबोट लागले आहे. गुंड मंत्रालयाता रिल बनवतात. पुण्यात 200 गुंडांची परेड होते त्यानंतर पुण्यात 2200 कोटींचे ड्रग सापडते तरी सरकार गप्प आहे. सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोर्टात न टिकणारं आरक्षण दिलं आहे. शेतकर्‍यांची घोर फसवणूक केली आहे. शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन खरेदी केली जात आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना पाच रूपयांचे अनुदान दिले नाही. तरीही सरकार टेंभा मिरवते आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकर्‍यांची, जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. त्यामुळे आम्ही या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. यांच्या पापात आम्ही सहभागी होणार नाही. हे फसवे चहापान आम्ही घेणार नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उद्या मांडणार अंतरिम अर्थसंकल्प – विधिमंडळ सचिवालयाने निश्‍चित केलेल्या कामकाजानुसार 26 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन  2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे  पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडून  कामकाज संपेल. 27 फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अधिवेशनाच्या तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल.

चहापान करून पापाचे वाटेकरी होणार नाही ः वडेट्टीवार – अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर महाविकास आघाडीच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे. फसव्या सरकारच्या चहापान घेऊन आम्हाल पापाचे वाटेकरी व्हायचे नाही, अशी भूमिका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकर्‍यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्‍नाकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे.

COMMENTS