वर्धा ः नागपूर न्यायालयात वकीली करणारे (27) वर्षीय विधीज्ञ काही कामानिमित्त वर्धेत आले होते. रेल्वे स्थानकावरुन पुलगावकडे जाणार्या गाडीत बसल्यान

वर्धा ः नागपूर न्यायालयात वकीली करणारे (27) वर्षीय विधीज्ञ काही कामानिमित्त वर्धेत आले होते. रेल्वे स्थानकावरुन पुलगावकडे जाणार्या गाडीत बसल्यानंतर ती गाडी पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबत नसल्याचे लक्षात येताच, त्या धावत्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न केला असता, दरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वर्धा रेल्वे स्थानकाजवळ घडली. अक्षय रंगारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पुलगाव येथील फुलफैल येथे राहत असलेले अक्षय रमेशराव रंगारी वय (27) पेशाने वकील असून ते नागपूर न्यायालयात वकिली करीत असत.
COMMENTS