Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्हा बँक ढोबळ नफ्यामध्ये राज्यात अव्वल

चेअरमन आमदार धिरज देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती

लातूर प्रतिनिधी - जिल्ह्यातील अर्थकारणातील ‘कल्पवृक्ष’असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांना प्राधान्य देऊन त्यांना मोठ्या प्रम

बोरगावकरांच्या ’नदीष्ट’ला 5 लाखांचा भाषा सन्मान
चिपळूण येथील सुभेदार अजय ढगळे शहीद
रेल्वेत चोर्‍या करणारा जेरबंद

लातूर प्रतिनिधी – जिल्ह्यातील अर्थकारणातील ‘कल्पवृक्ष’असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांना प्राधान्य देऊन त्यांना मोठ्या प्रमाणात पीककर्ज वाटप केले आहे. गेल्यावर्षीच्या आर्थिक वर्षात 932 कोटीचे उद्दिष्ट असताना 950 कोटी तर यंदाही 950 कोटीचे उद्दिष्ट असताना 1 हजार 780 कोटीचे वाटप केले. ठेवीच्या तुलनेत हे कर्ज वाटप 50 टक्के आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात 7 हजार 300 कोटींचा व्यवसाय करीत 111 कोटीचा ढोबळ नफा मिळवला आहे. व्यवसायाच्या तुलनेत बँकेला 1.51 टक्के नफा झाला आहे. या टक्केवारीत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या राज्यात अव्वल असल्याचे बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत शनिवार, दि. 15 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव, संचालक श्रीपतराव काकडे, अशोक गोविंदपूरकर, पृथ्वीराज सिरसाट, एन. आर. पाटील, श्रीमती केंद्रे, कार्यकारी संचालक एच. जे. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षानंतर बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख पुढे म्हणाले की, प्रतिकूल स्थितीत बँकेने मार्च 2023 अखेर 98.85 टक्के कर्ज वसुली केली आहे. जिल्हा बँकेने नेहमीच सरकारने बिनव्याजी कर्जासाठी निश्चित केलेल्या मर्यादेच्या पुढे जाऊन शेतक-यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज दिले. यासाठी बँकेने 2017 पासून विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी व्याज परतावा योजना हाती घेतली. यातूनच बँकेने शेतक-यांना सुरवातीला 2, त्यानंतर 3 व आता 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले. योजनेचा लाभ मोठ्या संख्येने शेतक-यांना देण्यासाठी गेल्यावर्षी हेक्टरी पीक कर्जदरातही भरीव वाढ केली. यामुळेच मागील सात वर्षात बँकेच्या सुमारे 77 हजार 290 शेतक-यांनी बिनव्याजी कर्जाचा लाभ घेतला असून बँकेने या शेतक-यांना साडेआठ कोटीचा व्याज परतावा दिला आहे. यासाठी बँकेने स्वनिधीतूनही व्याजाचा भार सोसला. सरलेल्या आर्थिक वर्षात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेत 2 लाख 41 हजार शेतक-यांना 580 कोटी दिले. तुती लागवड व रेशिमसाठी 102 शेतक-यांना दीड कोटीचे बिनव्याजी कर्ज वाटप करण्यात आले. जनता अपघात योजनेत अडीच लाख शेतक-यांचा विमा, बाराशे शेतक-यांना पंधरा कोटी भरपाई देण्यात आली. उच्च शिक्षणासाठी 356 विद्यार्थ्यांना 10 कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले. शुभमंगल योजनेत 3 हजार 705 जणांना 21 कोटीचे कर्ज देण्यात आले असून सिबीलनुसार पगारदार कर्मचा-यांच्या कर्ज वाटपातून 52 कोटीचा व्यवसाय करण्यात आल्याचे बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले. पुणे, सांगली, कोल्हापूर व सातारा या आघाडीच्या बँकांनी केंद्राने व्याज परताव्यात कपात केल्यानंतर बिनव्याजी कर्ज देण्यासाठी हात आखाडता घेतला. शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्यास असमर्थता दाखवली. लातूर जिल्हा बँकेने मात्र, शेतक-यांना या बिनव्याजी कर्ज योजनेतून मिळणारा मोठा आर्थिक आधार लक्षात घेता शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याची योजना चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेतून बँकेला सरलेल्या आर्थिक वर्षात साडेतीन हजार नवीन शेतकरी कर्जदार मिळाले व कर्ज वाटपाचा टक्काही वाढला. यामुळे ही योजना कोणत्याही स्थितीत बंद करणार नसल्याचे आमदार धिरज देशमुख यांनी स्पष्ट केले. बँकेच्या आगामी वाटचालीबाबत बोलताना चेअमन आमदार धिरज देशमुख म्हणाले की, विद्यमान वर्षापासून 2026 पर्यंत 10 हजार कोटींचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे. तीन हजार आठशेच्या ठेवी साडेपाच हजार कोटीवर नेणार असून कर्ज वाटपही साडेतीन हजार कोटीवरुन साडेचार हजार कोटी करण्याचा मानस आहे. विविध कार्यकारी सोसायट्यांना कार्यालयासाठी कर्ज दिले जाणार आहे. बँकेच्या ऑनलाईन व अन्य सुविधांचे बळकटीकरण करणे, ऊस तोडणीसाठी शंभर हार्वेस्टर खरेदीला कर्ज देण्यासोबतच बँकेतील कर्मचारी भरतीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS