Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयटीआय प्रवेशाची अंतिम तारीख 24 ऑगस्ट

प्राचार्य एस. के. जाधव यांची माहिती

कोपरगाव शहर ः व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव मध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2024 करीता

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी
देवळाली प्रवरा शाळेत आंनद मेळावा उत्साहात
प्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’ LokNews24

कोपरगाव शहर ः व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव मध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2024 करीता उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या आयटीआय अभ्यासक्रमा करीता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फॉर्म भरत प्रवेशाची अंतिम तारीख 24 ऑगस्ट असल्याची  माहिती प्राचार्य एस के जाधव यांनी दिली आहे. याविषयी प्राचार्य जाधव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव मध्ये इलेक्ट्रिशन (विजतंत्री) दोन वर्ष दहावी पास, वायरमन (तारतंत्री) दोन वर्ष दहावी पास नापास, फिटर (जोडारी) दोन वर्षे दहावी पास, टर्नर (कातारी) दोन वर्ष दहावी पास, वेल्डर (संधाता) एक वर्ष दहावी पास नापास, प्लंबर (नळ कारागीर) एक वर्ष दहावी पास नापास व ड्रेस मेकिंग (टेलर) एक वर्ष दहावी पास नापास हे अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी हीींिं//रवाळीीळेप.र्वींशीं.र्सेीं.ळप या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरत कोपरगाव आय.टी. आय कॉलेज या विकल्पाची निवड करत आपल्या मूळ कागदपत्राचे कोपरगाव आयटीआय कॉलेजमध्ये प्रवेश समितीमार्फत आपला प्रवेश फॉर्म आजच कन्फर्म करून घ्यावा. प्रवेशासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 24 ऑगस्ट 2024 असुन ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत  प्रवेशासाठी फॉर्म  भरला नाही त्यांनी आजच फॉर्म भरुन आयटीआय मध्ये प्रवेश नक्की करून घ्यावा असे आवाहन प्राचार्य जाधव यांनी केले आहे.

COMMENTS