अहमदनगर ः हायहोल्टेज लढत असलेल्या अहमदनगर दक्षिणमधून नीलेश लंके यांचाच डंका वाजल्याचे दिसून आले. एकीकडे राजकीय वारसा असणारे खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर ः हायहोल्टेज लढत असलेल्या अहमदनगर दक्षिणमधून नीलेश लंके यांचाच डंका वाजल्याचे दिसून आले. एकीकडे राजकीय वारसा असणारे खासदार डॉ. सुजय विखे यांना आपला गड कायम राखता आलेला नाही. याउलट साधा सर्वसामान्य माणून म्हणून ओळख असलेले नीलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा निवडणूक लढत तिरंगी झाल्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे रिंगणात होते तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत असतांना ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रूपवते रिंगणात उतरल्यामुळे ही लढत तिरंगी झाली होती. मात्र सुरूवातीपासूनच या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला आहे.
अहमदनगरमध्ये एकूण झालेले मतदान ः 10,72,980
नीलेश लंके यांना मिळालेली मते ः 5,82,628
डॉ. सुजय विखे यांना मिळालेले मतदान ः 4,89,278
निकाल ः 93,350 मतांनी लंके विजयी
COMMENTS