Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाथषष्ठी सोहळ्यात लाखो भाविकांची मांदियाळी

पैठण ः राज्यात पैठणच्या नाथ षष्ठीनिमित्त लाखो भाविकांची नाथांच्या नाथनगरीत मोठी गर्दी उसळली होती. दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या नाथांच्या नाथनगरी

अखेर तळोदा परिसरातील बिबट्या जेरबंद
मराठवाडा भूकंपांच्या धक्कयाने हादरला
वडिलांच्या मृत्यूनंतर लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पैठण ः राज्यात पैठणच्या नाथ षष्ठीनिमित्त लाखो भाविकांची नाथांच्या नाथनगरीत मोठी गर्दी उसळली होती. दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या नाथांच्या नाथनगरीत 425 वा नाथ षष्ठी सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरातून वारकर्‍यांसह लाखो भाविक पैठणमध्ये दाखल झाले आहेत. या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाच्या पाचशेच्यावर दिंड्या शनिवारी मध्यरात्रीपर्यंत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. या सोहळ्यासाठी पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. षष्ठीच्या दिवशी पहाटे दोन वाजता श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात आला. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन वद्य षष्ठी ही आहे. त्यामुळे दरवर्षी या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो, ज्याला नाथ षष्ठी सोहळा म्हणून ओळखले जाते. तसेच अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सवाची समाप्ती होत असते. या महोत्सवात राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दिंडीने यात सहभागी होत असतात.

COMMENTS