पुणे : दिंडीचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी वारकर्यांसाठी अल्पोहार फल आहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जग
पुणे : दिंडीचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी वारकर्यांसाठी अल्पोहार फल आहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच बीजसोहळा बुधवारी देहू नगरीत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू मधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मधील मंदिरात करण्यात आली आहे. या मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज यांचे फुलांनी तयार चित्र देखील तयार करण्यात आले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 376 व्या बीज सोहळा निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून हजारो दिंड्या देहू मध्ये दाखल होत असतात. बीज सोहळ्यानिमित्ताने पवन मावळ दिंडी समाजाच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीची ओवळे येथून देहूकडे प्रस्थान झाले आहे. कोहळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये वीणा पूजन करून दिंडीचे देहुकडे प्रस्थान ठेवले आहे. या दिंडी मध्ये दीवड,अडले बुद्रुक, अडले खुर्द, पुसाणे, पाचाने, कुसगाव, सांगवडे, व इतर गावातील शेतकरी वारकरी सहभागी झाले आहे. दिंडीचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी वारकर्यांसाठी अल्पोहार फल आहाराची व्यवस्था करण्यात आली होती
COMMENTS