Homeताज्या बातम्यासंपादकीय

लग्नाळूंचा मोर्चा आणि वास्तव

लग्न करण्याची इच्छा आहे, सुशिक्षित आहे, कमावता आहे, शेती आहे, संपत्ती आहे, पण मुलगी मिळत नाही, अशी अनेकांची अवस्था. अशा लग्नाळूंनी सोलापूरमध्ये व

शेतकर्‍यांप्रती सरकारचे उदासीन धोरण
जागावाटपाचा गुंता
सरकारची दुहेरी कोंडी

लग्न करण्याची इच्छा आहे, सुशिक्षित आहे, कमावता आहे, शेती आहे, संपत्ती आहे, पण मुलगी मिळत नाही, अशी अनेकांची अवस्था. अशा लग्नाळूंनी सोलापूरमध्ये विवाहेच्छुक युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर नवरी मिळावी, या मागणीसाठी मोर्चा काढल्याची धक्कादायक घटना घडली. ज्यांची लग्नाचे वय झाली आहेत, अशा मुलांना मुली मिळत नसल्याने विवाहाचे वय निघून चालले आहे. गर्भलिंग निदान चाचणी करण्याच्या तंत्रज्ञानाचा चूकीच्या पध्दतीने केलेले वापर आज मुख्य अडचण ठरू लागले आहे. प्रत्येक व्यक्ती सदन कुटुंबातील व्यक्ती तसेच सरकारी नोकरदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. मात्र, मुलींच्या वाढलेल्या आपेक्षा व मुलांकडून त्याची पुर्तता करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे घरातील छोटी बहिण आपल्या भावाला गोरी गोरीपान फुलासारखी छान दादा मला एक वहिणी आण हे गीत गावून आपल्या भावासमोर आपला अल्लडपणा व्यक्त करणार्‍या बहिणीची मागणी पुर्ण करण्यास भाऊ हतबल झाला असल्याचे पहायला मिळत आहे. वंशाचा दिवा मुलगाच हवा, हा अट्टहास केला जात असल्याचे पहावयास मिळत होते. घरातील ज्येष्ठांच्या ह्या इच्छा नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे काम सोनोग्राफीच्या माध्यमातून पूर्ण करण्यास काही प्रमाणात यश आले. हे करत असताना दर हजारी मुलांच्या पाठीमागे मुलींचा जन्मदर घटला. सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानामुळे गर्भातच मुलीची हत्त्या करण्यात आल्या. यामुळे कित्त्येक गरोदर महिलांना आपल्या जीवासही मुकावे लागले. ज्येष्ठांसह समाजाच्या नियमांची पुर्तता करताना सध्या भारत देशामध्ये 1000 मुलांच्या पाठीमागे 940 मुली जन्माला येत आहेत. या उलट केरळ सारख्या संपूर्ण साक्षर असलेल्या राज्यामध्ये 1000 मुलांच्या पाठीमागे 1050 मुलींचा जन्म होत असल्याचे सरकारी आकडे आहेत. तर महाराष्ट्र राज्यात 1000 मुलांच्या पाठीमागे हा दर खालावत चालल्याचे दिसून येत आहे. ही तफावत आजच्या सुशिक्षित लोकांनी डॉक्टरांच्या मदतीने ही परिस्थित आणली आहे. याचा आता परिणाम दिसू लागला आहे, ज्योती क्रांती परिषदेने मोर्चा काढून सोनोग्राफीच्या दुरगामी परिणामांचा आढावा घेणारा मोर्चा काढण्यात आला आहे. याबाबत तरूणांनी मागणी करताना आम्हाला आमच्या पसंतीची बायको मिळावी ही इच्छा व्यक्त करत राज्य सरकारने कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कायद्याच्या माध्यमातून होत असलेली तरूणांची होत असलेली आंबवणूक कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करताना सरकारी रुग्णालयात योग्य पध्दतीने उपचार मिळत नसल्याने खाजगी डॉक्टरांचा धंदा फोफावला असल्याचे पहावयास मिळत आहे. गर्भजल चिकित्सा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सर्व रुग्णालयामध्ये याबाबतचे फलक झळकत आहेत. हे सर्व करत असतानाही मुलींचा जन्मदर का वाढत नाही? हा एक सवाल निर्सगाला आव्हान देणारा आहे. त्यामुळे आज कितीही डॉक्टरांनी आम्ही गर्भजल तपासणी करून लिंगभेदाची माहिती गर्भार महिलेच्या नातेवाईकांना सांगत  नसल्याचे कोणतेही प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही. निर्सगाने जे दिले ते घेतले, असे म्हणत असताना निर्सगाने समतोल राखण्याने काम केले आहे. मात्र, सध्याचे धनलाभासाठी काम करत असलेल्या डॉक्टरांनी किती जणांचे खून केले आहेत, याचे आत्मसर्मपण करण्याची गरज आहे.

COMMENTS