Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींना केवायसीसाठी 30 मार्चंपर्यंत मुदत

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळण्यात अडचणी आलेल्या हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्र

लाडक्या बहिणींचा थकीत हप्त्यांवरून भंडार्‍यात उद्रेक
लाडक्या बहिणींना मिळाले एकाच महिन्याचे पैसे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळण्यात अडचणी आलेल्या हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे अनेक लाभार्थी महिलांचे हप्ते रखडले होते. या पार्श्‍वभूमीवर महिला व बालविकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्याच्या विविध भागांत लाभ न मिळाल्याने महिलांनी संताप व्यक्त करत मोर्चेही काढले होते. या आंदोलनांची गंभीर दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने लाभार्थी महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार प्रमाणीकरणासह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, अर्ज भरताना कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहे किंवा निवृत्तीवेतन घेत आहे का, या संदर्भातील पर्याय निवडताना अनेक महिलांकडून अनवधानाने चुकीचा पर्याय निवडला गेला. या तांत्रिक चुकांमुळे अनेक पात्र महिलांची अपात्र ठरविण्यात नोंद झाली आणि त्यांच्या हप्त्यांचे वितरण थांबले होते. परिणामी लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली होती. या त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने 20 जानेवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांना प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश दिले होते. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि क्लिष्ट ठरत असल्याने लाभार्थी तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून ऑनलाईन पद्धतीनेच माहिती दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत होती. ज्या महिलांकडून अर्जात चुकीची माहिती नोंदवली गेली आहे, त्यांना आता ऑनलाईन पद्धतीने आवश्यक दुरुस्ती करता येणार आहे. ही सुविधा 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध राहणार आहे. या निर्णयामुळे पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या हजारो महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रखडलेले हप्ते लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS