Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझ्या विजयात थोरातांची श्रीकृष्णाची भूमिका ः खा. लंके

संगमनेर ः मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती. अशा या लक्षवेधी ठरलेल्या

श्रीगोंद्यात खा. निलेश लंके यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन
खा. नीलेश लंके यांचा राजधानीत चक्क रिक्षातून प्रवास
खा. नीलेश लंकेंनी लोकसभेत घेतली इंग्रजीतून शपथ

संगमनेर ः मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती. अशा या लक्षवेधी ठरलेल्या लढाईत आमदार बाळासाहेब थोरात यांचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा असून त्यांनी आपल्या विजयात श्रीकृष्णाची भूमिका बजावली असल्याचे गौरवउद्गार नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी काढले असून आमदार थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त  केली. यावेळी अमृत उद्योग समूहाच्या वतीने खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की, महाभारतात कौरव आणि पांडवांच्या युद्धात श्रीकृष्णाने अत्यंत मोलाची भूमिका बजावली तशीच भूमिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विजयात बजावली आहे. माझ्या विजयाचे खरे किंगमेकर आमदार थोरात हे आहेत. मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे.परंतु संघर्षातून पुढे आलो आहे.ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार बाळासाहेब थोरात यांचा विश्‍वास आणि जनतेची साथ यामुळे बलाढ्य शक्तीचा पराभव करण्यात यश मिळाले आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक प्रकार केले. धमक्या दिल्या, गुन्हे दाखल केले, नागरिकांच्या बोटाला बाहेर शाई लावण्याचा प्रयत्न केला .परंतु असे करूनही  जनतेने त्यांना साफ नाकारले. आमदार बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा अत्यंत निष्ठावंत आणि प्रामाणिक असून त्यांच्या मोलाच्या मदतीने हा विजय साकारला आहे. आगामी काळामध्ये जिल्ह्यात सर्वांना बरोबर घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्वांनी काम करायचे आहे. तर आमदार थोरात म्हणाले की, नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरीबाची होती. निलेश लंके सामान्य परिवारातील असून संघर्षातून पुढे आले आहे. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले असून त्यांची लोकप्रियता मोठी होती. त्यांच्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन विद्यमान सत्ताधार्‍यांनी दडपशाहीचा वापर सुरू केला. जिल्ह्यात त्यांनी सत्तेचा गैरवापर करून संगमनेर पारनेर सह सर्वत्र दहशत निर्माण केली आहे.सत्तेचा वापर हा सामान्यांच्या विकासाऐवजी ते जिरवा – जिरवीचे राजकारण करून दडपशाही निर्माण करत आहे.

थोरातांना फेटा बांधून लंके यांनी बांधला विजयाचा फेटा – नगर दक्षिणची निवडणुकी अत्यंत अटीतटीची व संघर्षाची होती. या निवडणुकीत आमदार थोरात हे भक्कम पाठीशी उभे राहिले. त्यांनी विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याने त्यांनी फेटा बांधल्याशिवाय आपण फेटा बांधणार नाही. हा पण मी केला होता. विजय झाल्यानंतर मी कुठेही फेटा बांधला नाही. थोरात साहेबांनी फेटा बांधावा तरच मी फेटा बांधील असा आग्रह केल्यानंतर आमदार थोरात यांनी सर्वांच्या आग्रहास्तव फेटा बांधला व त्यानंतरच खा. निलेश लंके यांनी फेटा बांधला. यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

COMMENTS