क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा स्मृतीस्तंभ उभारणार : निरंजन डावखरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा स्मृतीस्तंभ उभारणार : निरंजन डावखरे

ठाणे : आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्यापासून तरुणांना कायम प्रेरणा मिळत राहावी, यासाठी राघोजी भांगरे यांनी बलिदान दिलेल्या ठाणे कारागृहातील

गोदामाई प्रतिष्ठानचा उपक्रम प्रेरणादायी ः कपाळे
स्वच्छ-जलशक्ती-हरित पर्यावरण २०२१ चा कोपरगावात शुभारंभ
सुनीता इंगळे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

ठाणे : आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्यापासून तरुणांना कायम प्रेरणा मिळत राहावी, यासाठी राघोजी भांगरे यांनी बलिदान दिलेल्या ठाणे कारागृहातील ठिकाणावर आमदार निधीतून स्मृतीस्तंभ उभारण्यात येईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी आज येथे दिली. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या १७४ व्या बलिदानदिनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने क्रांतीवीर राघोजी भांगरे चौकात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ठाणे मध्यवर्ती कारागृहात बलिदान दिलेल्या ठिकाणावर आदरांजली वाहण्यात आली. या वेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी मंत्री मधुकरराव पिचड, भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे आदींची उपस्थिती होती.
ठाणे कारागृहाबाहेर सद्यस्थितीतील राघोजी भांगरे यांचा पुतळा शहरातील महत्वाच्या भागात बसवावा. त्याचबरोबर केंद्र वा राज्य सरकारकडून निधी मिळवून ठाणे कारागृहात हुतात्म्यांना फाशी देण्यात आलेली जागा सुव्यवस्थित करावी, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली. क्रांतीवीर राघोजी भांगरेंनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान मोठे होते, अशी भावना श्री. पिचड यांनी व्यक्त केली. तर राघोजी भांगे यांनी अत्यल्प साधने असताना उभारलेला स्वातंत्र्यलढा हा एक असामान्य होता, अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे राघोजी भांगरे यांना बलिदानदिनी अभिवादन कार्यक्रम पार पडला नव्हता. मात्र, आता कोरोना निर्बंध उठल्यामुळे आज अभिवादनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

COMMENTS