Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच

कात्रत भागात केली वाहनांची तोेडफोड

पुणे : पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगेने दहशत निर्माण केली असून, ही दहशत मोडून काढण्यात पोलिस प्रशासनाला अपयश  येतांना दिसून येत आहे

विजेचा दाब वाढल्याने विद्युत उपकरणे जळून खाक
भाजपचे उत्तर प्रदेशात मिशन तीनशे
दिल्लीत बांधकामाधीन भिंत कोसळून 5 मजुरांचा मृत्यू

पुणे : पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगेने दहशत निर्माण केली असून, ही दहशत मोडून काढण्यात पोलिस प्रशासनाला अपयश  येतांना दिसून येत आहे. काल पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत निर्माण करत कात्रज परिसरात कोयता गँगने सोसायटीत असणार्‍या काही वाहनाची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुकर उर्फ अप्पा ग्यानबा भिलारे (वय 47), आकाश नानासाहेब गरवडे (वय 27), अमित उत्तम भिलारे (वय 36), फिरोज हसन शेख (वय 24), मुस्तफा मेहबूब शेख (वय 21, सर्व रा. भिलारेवाडी, कात्रज) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भिमाजी भिकाजी सावंत (वय 33, रा. ओमसाई निवास, भिलारेवाडी, कात्रज) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार कात्रज परिसरात राहणारे सावंत यांचा आरोपींशी भांडण झाले होते. आरोपी भिलारे, गरवडे, शेख आणि साथीदार ओम साई निवास सोसायटीच्या परिसरात आले असता त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. दरम्यान, त्यांनी आवारात लावण्यात आलेल्या दोन मोटारी, रिक्षा, दुचाकी, तसेच टँकरवर दगडफेक करत तोडफोड केली. यावेळी हवेत कोयते आणि दांडके फिरवून दहशत माजवली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली  आहे. सावंत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक ढमे तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी सहकार नगर येथे देखील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या वाढत्या घटनांमुळे पोलिस देखील अ‍ॅक्शनमोड मध्ये आले होते. त्यांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कारवाई देखील केली. या प्रकरणी एका टोळीवर मोका लावण्यात आला होता.

COMMENTS