Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच

पुणे: शिवाजीनगरहून संगमवाडी रस्त्यावर गुंडांच्या टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. कोयते उगारुन दहशत माजविण्यात काही स्थानिक तरुण सामील असल्य

डीसीसी बँकेतील पैसे वारसाला मिळावे,यासाठी बँकेच्या विरोधात पतुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू | LOKNews24
देवठाण येथील शिबिरातून 46 बॅगचे रक्तसंकलन
हृदयद्रावक ! तीन चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू | LOK News 24

पुणे: शिवाजीनगरहून संगमवाडी रस्त्यावर गुंडांच्या टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. कोयते उगारुन दहशत माजविण्यात काही स्थानिक तरुण सामील असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही.
या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून दहशत माजविणार्‍या तरुणांचा शोध घेण्यात येत आहे. येरवड्यातील संगमवाडी परिसरात तरुणांच्या दोनगटात वाद झाल्याने हाणामारी झाली. एका गटाने साथीदारांना बोलावून घेतले. दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने बिअरच्या बाटल्या रस्त्यात फोडल्या तसेच कोयते उगारुन दहशत माजविली. काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोळक्याने नागरिकांना धमकावले. या घटनेचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केले. सीसीटीव्ही चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. दहशत माजविण्यात काही स्थानिक तरुण सामील असल्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सामोपचाराने हाणामारीचे प्रकरण मिटवण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

COMMENTS