कोरठणला रविवारी १९ डिसेंबरला मार्गशीष पौर्णिमा उत्सव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरठणला रविवारी १९ डिसेंबरला मार्गशीष पौर्णिमा उत्सव

अहमदनगर : नगर-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिपळगावरोठा येथील ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंड

खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे रोज 40 जणांचा मृत्यू!
ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात खासदारांची अडवली गाडी

अहमदनगर : नगर-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिपळगावरोठा येथील ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा  दि १९ डिसेंबरला मार्गशीष पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. पौर्णिमेला सकाळी ६ वाजता श्री खंडोबा मंगलस्नान,अभिषेक पुजा होऊन सकाळी ७ वाजता महाआरती होईल.

सकाळी ९ वाजता देवाची पालखीतून प्रदक्षिणा मिरवणूक सवाद्य निघेल.भाविक भक्ताचे पालखी दर्शन व ओलांडा दर्शन,लंगर तोडणे,नैवैद्य हे धार्मिक विधी होऊन पालखी ११ वा मंदिरात परत आगमन होईल.  दुपारी ११ वाजल्यापासून पौर्णिमेचा महाप्रसाद वाटप ज्ञानदेव महादू खोसे व विकास पंढरीनाथ मुंढे यांच्यातर्फे होईल.मंदिर परिसर पर्यटन विकास योजने अंतर्गत सुशोभीकरण चालू असून भाविक भक्ताना सुविधा मिळत आहेत चंपाषष्ठी महोत्सव संपन्न झाल्यावरभाविक भक्त यात्रेकरू याना नववर्षाच्या दि १७ ते १९ जाणे यात्रेची ओढ निर्माण झाली आहे. देवस्थानतर्फे पौर्णिमा उत्सवात दर्शन व्यवस्था,वाहने पार्किंग,पिण्याचे पाणी नियोजन आहे.तरी सर्व भाविक भक्तानी उत्सव पर्वणी व देवदर्शन पालखी सोहळा,महाप्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे निवेदन देवस्थान तर्फे एड पांडुरंग गायकवाड उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,सरचिटणीस महेन्द्र नरड,चिटणीस सौ.मनिषा जगदाळे,खजिनदार हनुमंत सुपेकर,विश्वस्त किसन मुंढे, अश्विनी थोरात,चंद्रभान ठुबे,मोहन घनदाट,अमर गुंजाळ,किसन धुमाळ,बन्सी ढोमे,दिलीप घोडके, साहिबा गुंजाळ ,देविदास क्षीरसागर सर्व आजी-माजी विश्‍वस्त ग्रामस्थ,भक्तगण यांनी केले आहे.  

COMMENTS