Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावकरांना मिळणार तीन दिवसाआड पाणी

आता चारही तळ्यांचे काम हाती घेणार ः आ.आशुतोष काळे

कोपरगाव : कोणीही कितीही अफवा पसरविल्या व कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आ. आशुतोष काळे यांनी 5 नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे घेवून जात जलपूजन

पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू
आगाऊ पिकविमा भरपाई द्याः आ. काळे यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी
सहा देवस्थानच्या 3 कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी

कोपरगाव : कोणीही कितीही अफवा पसरविल्या व कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आ. आशुतोष काळे यांनी 5 नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे घेवून जात जलपूजन देखील केले आहे. त्यानंतर विरोधकांना अफवा पसरविण्यासाठी अजिबात संधी न देता उर्वरित एक ते चार तळ्यांचे काम देखील हाती घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करून येत्या रविवार (दि.22) पासून कोपरगावकरांना नियमितपणे तीन दिवसाआड पाणी देणार असल्याची सुखद बातमी आ.आशुतोष काळे यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिली असून कोपरगावकरांना गणपती बाप्पा पावला आहे.
आ.आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.17) रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी पत्रकार परिषद घेवून कोपरगावकरांना आनंदाची बातमी दिली. पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, 131.24 कोटी निधीतून बांधण्यात आलेला 5 नंबर साठवण तलाव पूर्ण झाला असून वितरण व्यवस्थेच्या सुरु असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्याकडून जाणून घेतली असता कोपरगावकरांचे बहुतांश नळ कनेक्शन अजूनही जुन्या पाईप लाईनवर आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून ते नळ कनेक्शन नवीन पाईप लाईनवर शिफ्ट करण्याचं काम तातडीने हाती घ्यावे. जेणेकरून वितरण करतांना अडचण येणार नाही. सर्व कनेक्शन नव्या पाईपलाईनवर आल्यानंतर दररोज पाणी कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावा व त्यासाठी येणार्‍या अडचणी दूर कराव्यात. नागरिकांना रविवार पासून तीन दिवसाआड पाणी मिळणार आहे. ज्याप्रमाणे पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण केले त्याप्रमाणे एक ते चारही साठवण तलावाचे काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आपला अपेक्षित 960 एमएलडी पाणी साठा होऊ शकेल त्या कामांना यानंतर गती देणार आहे. शहरांमध्ये पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था यांचे थोडेफार अपूर्ण राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासीयांना लवकरात लवकर नियमित पाणी मिळावे यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांना आ. आशुतोष काळे यांनी सूचना दिल्या. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या सूचनेवरून रविवार (दि.22) पासून कोपरगावकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. हे पाणी पुरवठ्याचे दिवस अजून कमी होवून नागरिकांना नियमित पाणी देण्यासाठी नागरिकांनी आपले नळ कनेक्शन जुन्या पाईपलाईन वरून नवीन योजनेच्या पाईपलाईनवर जोडणी करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

COMMENTS