Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव : पाणीपुरवठा योजना कालव्यावर आरक्षण मिळावे : आ. आशुतोष काळे

कोपरगाव : कोपरगाव मतदार मतदारसंघातील पाटबंधारे विभागाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी आ.आशुतोष

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
’लिव्ह इन’चा हट्ट धरणार्‍या तरुणीची हत्या
पाणी पुरठ्यासाठी ग्रामपंचायत अभियंत्याच्या दालना समोर आमरण उपोषण

कोपरगाव : कोपरगाव मतदार मतदारसंघातील पाटबंधारे विभागाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांकडे केली होती. त्या मागणीनुसार बुधवार (दि.१२) रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले असता हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, सचिव संजय बेलसरे, गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तीरनमवार, जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता विजय घोगरे व गवळी, छत्रपती संभाजीनगर अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सब्बीनवार,जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा नासिकचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नासिकचे राजेश गोर्वधणे, मंत्रालय जलसंपदा विभागाचे सह सचिव तथा मुख्य अभियंता संजीव टाटू आदी अधिकाऱ्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी अनेक महत्वाचे प्रश्न मांडून त्यामुळे येत असलेल्या अडचणी मांडल्या.

यामध्ये प्रामुख्याने कोपरगाव मतदारसंघातील प्रस्तावित असलेल्या पाणीपुरवठा योजनांना कालव्यावर आरक्षण मिळावे. गोदावरी कालवे नूतनीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी दोन्ही कालव्यांचे क्षेत्रीय उपविभागीय कार्यालय नाशिक येथून कोपरगाव व राहाता येथे स्थलांतरीत करावे.नांदूर मधमेश्वर जलद कालव्याची देखभाल व दुरुस्ती करावी.विशेष बाब म्हणून कोपरगाव मतदारसंघातील चासनळी, जेऊर कुंभारी व मायगाव देवी येथे प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजनांना गोदावरी कालव्यांवर आरक्षण द्यावे.कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा तलाव क्र.४ व ५ साठी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून मुख्य विमोचक बांधून मिळावे.गोदावरी डाव्या तट कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांसाठी खरीप हंगामात ओव्हरफ्लोच्या काळात गोदावरी डाव्या कालव्यावर उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्यात यावी.दारणा प्रकल्पाअंतर्गत गोदावरी डावा तट कालवा व वितरण प्रणाली सुधारणा करणे व कामाचे प्रथम टप्प्यात समावेश करण्यात यावा. नांदूर मधमेश्वर जलद कालव्याअंतर्गत वितरिका क्र. १ व २ चे नूतनीकरण व सिमेंट काँक्रिट अस्तरीकरण करण्यात यावे. गोदावरी नदीवरील केटीवेअर मधून उपसा सिंचनासाठी परवानगी मिळावी.गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती साखर कारखान्यांमार्फत केली जात असुन सन २००६ ते २०१२ व सन २०२१ ते २०२४ ह्या कालावधीतील कारखान्यांचे देय बिलाच्या रकमेचे समायोजन पाणी पट्टीमध्ये करण्यात यावे. कोपरगाव शहरातील पाटबंधारे विभागाची सर्वे नं. १६३० मधील जागा रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयाला देण्यात यावी. सर्वे नं. २३७ मधील जागा कोपरगाव शहरासाठी व्यापारी संकुल व उद्यानासाठी नगरपरीषदेकडे वर्ग करण्यात यावी अशा विविध मागण्या व प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित करून हे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी केली.

सर्व मागण्या जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणून घेत या सर्व मागण्या लवकरात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही देवून या मागण्या पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात गोदावरी कालव्यांच्या कामाला गती येणार असून पूर्व भागातील गावांसाठी खरीप हंगामात ओव्हरफ्लोच्या काळात गोदावरी डाव्या कालव्यावर उपसा जलसिंचन योजना मंजूर होऊन त्या गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या केटीवेअर मधून उपसा सिंचनासाठी पाणी उचलण्यास परवानगी मिळून अनेक गावांना फायदा होणार आहे. आपल्या अभ्यासू वृत्तीतून आ.आशुतोष काळे यांनी मांडलेल्या जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांना चालना मिळून त्याचे दूरगामी फायदे होणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक करून त्यांचे आभार मानले आहेत

COMMENTS