Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरास नियमित पाणी पुरवठा होणार

आ.काळेंच्या सूचना ; गटनेत्या पहाडे यांच्या सूचनाकोपरगाव : साठवण तलावातील पाणी साठा कमी झाल्यामुळे शहरातील नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा

‘डान्स कोपरगाव डान्स’मध्ये ‘संत ज्ञानेश्वर’ द्वितीय 
संजीवनीच्या प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
एसएसजीएम’मध्ये भाषा विषयक कार्यशाळा उत्साहात 

आ.काळेंच्या सूचना ; गटनेत्या पहाडे यांच्या सूचना
कोपरगाव : साठवण तलावातील पाणी साठा कमी झाल्यामुळे शहरातील नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा दिवसांमध्ये वाढ करण्याचे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु आ.आशुतोष काळे यांनी तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा नियमितपणे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व १२ नगरसेवकांनी सोमवारी (दि.१२) कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची पाहणी केली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मागील आठवड्यात आ. आशुतोष काळे यांनी  नगरसेवकांसमवेत कोपरगाव नगरपरिषद कार्यालयाला भेट दिली. मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांचा पाणी साठा कमी झाल्यामुळे अडचणी येत असल्याचे सांगितले. पाणी पुरवठ्याची अडचण होवू नये यासाठी आ. काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या.
सूचनेची अंमलबजावणी करून तात्काळ गोदावरी कालव्यांना पाणी सोडले. सोमवारी (दि.१२)  प्रत्यक्षात साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोपरगावकरांवर जास्त दिवसांनी पाणी पुरवठा होण्याची टांगती तलवार आ.आशुतोष काळे यांच्यामुळे दूर झाली आहे. त्यामुळे आता कोपरगावकरांना नियमितपणे पूर्वीप्रमाणे चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा असे गटनेत्या गौरी पहाडे यांनी सांगितले.  
 यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांच्या समवेत नगरसेविका माधवी वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, जनार्दन कदम, निर्मला आढाव, स्मिता साबळे,इम्तियाज अत्तार, वाल्मिक लाहीरे, राहुल शिरसाठ, सोनम त्रिभुवन, सोनाली कपिले, बाळासाहेब रुईकर आदीसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.    

COMMENTS