Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये डॉक्टर असोसिएशनकडून कोलकाता घटनेचा निषेध

जामखेड ः कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अमानुषपणे बलात्कार व हत्या प्रकरणानंतर देशभरातील डॉक्टर्स आक्रम

राहुरी शहरात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; शिवप्रेमींचा संताप
शेवगाव शहरात सायकल फेरी काढून मतदान जागृती अभियान
तब्बल 42 तोळे सोने हस्तगत…सतरा घरफोड्या उघडकीस

जामखेड ः कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अमानुषपणे बलात्कार व हत्या प्रकरणानंतर देशभरातील डॉक्टर्स आक्रमक झाले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर सगळीकडे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात असून याच अनुषंगाने जामखेड तालुका डॉक्टर असोशियनच्या वतीने अमानुषपणे झालेल्या महीला डॉक्टरच्या हत्येचा निषेध केला.
तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निषेधाबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनावर डॉ सादेख पठाण, डॉ.भरत देवकर, डॉ.फारूक आझम, डॉ. चन्द्रकिरण भोसले, डॉ. सौ. विद्या तोंडे, डॉ. अक्षय अडाळे, डॉ. विकी दळवी, डॉ. निखील वारे, डॉ. संदीप बेलेकर, डॉ. संतोष सांगळे  आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनात म्हंटले आहे की कोलकत्ता येथे आरजी कार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे सरकारी कर्तव्यावर रात्रपाळी करत असताना महिला डॉक्टर वरती अत्यंत अमानुषपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबधित गून्हेगारांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

COMMENTS